74,999 रुपयांचा Samsung च्या जबरदस्त 5G फोनवर बंपर डिस्काउंट, हजारोंची बचत करा

Updated on 01-May-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनवर डिस्काउंट

स्मार्टफोनवर संपूर्ण 64% डिस्काउंट उपलब्ध

HDFC कार्डवर 2,000 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट

Amazon दररोज डील ऑफ द डे उपलब्ध करतो. दरम्यान, Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन 64% सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन 74,999 रुपयांचा आहे, मात्र सवलतीसह हा फोन 26,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर आणखीही अनेक उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यानंतर फोन अगदी बजेट किमितीत खरेदी करता येणार आहे.  

किंमत आणि ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन Amazonवर 26,990 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. यासोबतच तुम्ही हा फोन EMI ऑप्शनसह देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला 1,290 रुपये द्यावे लागतील. जर तुमच्याकडे HDFC कार्ड असेल तर तुम्हाला 2,000 रुपयांची इन्स्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे. येथून खरेदी करा 

जर तुम्हाला हा फोन आणखी कमी किमतीत हवा असेल तर तुमच्यासाठी आणखी एक ऑफर येणार आहे. एक्सचेंज ऑफरअंतर्गत हा फोन अगदी बेजत किमतीत खरेदी करता येईल. यासह तुम्हाला 25,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास तुम्हाला फोन 1,490 रुपयांमध्ये मिळेल.  

स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा Infinity-O सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर काम करतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी पहिला सेन्सर 12 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 8 मेगापिक्सेल आणि तिसरा 12 मेगापिक्सेल. फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 4500mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :