Samsung Galaxy S10 to come with Three Different Szes Report Reveals: सॅमसंग ला Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन 9 ऑगस्ट ला लॉन्च करणार आहे आणि त्या साठी खुप कमी वेळ आता उरला आहे. पण या डिवाइस व्यतिरिक्त अजून एका डिवाइस बद्दल येणारी माहिती काही थांबत नाही, कंपनी च्या अन्य फ्लॅगशिप डिवाइस Samsung Galaxy S10 बद्दल माहिती येतच आहे. या डिवाइस बद्दल मिळालेली ही काही पहिली माहिती नाही, या आधी पण या डिवाइस बद्दल इंटरनेट वर बर्याचदा खुप काही समोर आले आहे. विशेष म्हणजे आता विश्लेषक Ming-Chi Kuo ने सॅमसंग Galaxy S10 बद्दल माहिती दिली आहे.
या लीस्टर नुसार हा डिवाइस तिन वेगवेगळ्या साइज मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की Samsung Galaxy S10 स्मार्टफोन कंपनी 5.8-इंच, 6.1-इंच आणि 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च करू शकते. आधी आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाइस अनेक वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच तुमच्या पण लक्षात आले असेल की अॅप्पल च्या आगामी iPhones मध्ये पण अशाच प्रकाराची, याच साइज ची स्क्रीन असल्याची बातमी समोर आली आहे. आता कदाचित असे पण होऊ शकते की सॅमसंग आणि अॅप्पल आपले हे दोन्ही वेगवेगळे स्मार्टफोंस एकाच साइज च्या डिस्प्ले वेरिएंट्स मध्ये लॉन्च करतील.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजून एक बातमी असे पण सांगत होती की सॅमसंग गॅलेक्सी S10 डिवाइस मध्ये आईरिस स्कॅनर च्या जागी 3D फेस स्कॅनिंग फीचर सामील केला जाऊ शकतो. The Bell चा एक रिपोर्ट पाहिल्यास सॅमसंग गॅलेक्सी S10 कंपनी चा पहिला असा स्मार्टफोन असणार आहे, जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या डिवाइस मध्ये फक्त एवढच नसेल. कंपनी ने या डिवाइस साठी एका इजराइली कंपनी मँटिस सोबत भागीदारी केली आहे, जी 3D फेस स्कॅनिंग वर काम करत आहे, हा अॅप्पल च्या iPhone X सोबत मिळता जुळता असेल.
जर या कामात सॅमसंग ला यश मिळाले तर असे पण बोलू शकतो की कंपनी या डिवाइस मधून आईरिस स्कॅनर काढून टाकू शकते. यामुळे वेट आणि कॉस्ट सेविंग होईल.