याआधी पण सॅमसंग कडून आपल्या स्मार्टफोन्सचे लाइट वर्जन सादर करण्यात आले आहेत आणि येत्या काळात पण असेच काहीसे होणार आहे. असे बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या आगामी सॅमसंग गॅलेक्सी S10 चा एक लाइट वर्जन लॉन्च करणार आहे. असे पण म्हणू शकतो कि हा सॅमसंगचा पहिला फोन होने असेल जो कमी किंमतीती तीच परफॉरमेंस देणार आहे, जी तुम्हाला एका फ्लॅगशिप मोबाईल फोन मध्ये मिळते. एक नवीन रिपोर्ट आज समोर आला आहे जो या आगामी डिवाइस बद्दल खूप काही सांगत आहे.
Samsung Galaxy S10 आणि सॅमसंग गॅलेक्सी S10+ मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर यांचा एक लोअर वेरीएंट पण क्वालकॉम च्या आगामी स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. हा प्रोसेसर 4GB किंवा 6GB रॅम वाल्या स्मार्टफोन्स मध्ये पण मिळू शकतो. पण जर याच्या स्टॅण्डर्ड स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर हा फक्त 64GB स्टोरेज सह येईल असे बोलले जात आहे. जर तुम्ही जास्त पैसे खर्च करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही याचा 6GB रॅम आणि 128GB मॉडेल पण घेऊ शकता.
जर फक्त सॅमसंग गॅलेक्सी S10 Lite मोबाईल फोनची बद्दल चर्चा करायची झाल्यास असे पण बोलले जात आहे कि हा मोबाईल फोन सॅमसंग नवीन प्रकारच्या इनफिनिटी डिस्प्ले म्हणजेच इनफिनिटी-O सह लॉन्च करू शकते. हा एक मेटल फ्रेम सह येणार मोबाईल फोन आहे, आणि यात तुम्हाला एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. फोन मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप पण मिळणार आहे.
असे बोलले जात आहे कि बजेट सॅमसंग गॅलेक्सी S10 मोबाईल फोन पुढल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या MWC 2019 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी S10 आणि सॅमसंग गॅलेक्सी S10+ सोबत लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या डिवाइसचा सेल मार्च मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. असे सांगण्यात येत आहे कि हा मोबाईल फोन 650 डॉलर आणि 750 डॉलर च्या दरम्यातच्या किंमतीती लॉन्च केला जाऊ शकतो.