नॉच विना येऊ शकतात Galaxy S10 फोन्स, स्पेक्स झाले लीक

Updated on 24-Jan-2019
HIGHLIGHTS

सॅमसंग आपली अपकमिंग Galaxy S10 सीरीज पुढील महिन्यात लॉन्च करू शकते. अलीकडेच या सीरीजचे काही फोटो लीक झाले आहेत ज्यावरून या फोन्सच्या काही फीचर्स आणि स्पेक्सचा अंदाज लावला जाऊ शकतो.

महत्वाचे मुद्दे:

  • पुढील महिन्यात होऊ शकतो लॉन्च
  • Galaxy S10 E असू शकतो 5G फोन
  • 3 -4 रियर कॅमेरा असू शकतात यात

स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच आपल्या यूजर्सना Galaxy S10 सीरीजच्या नव्या स्मार्टफोन्सची भेट देऊ शकते. पुढल्या महिन्यात 20 फेब्रवारीला कंपनी हे फोन्स लॉन्च करू शकते. बोलले जात आहे कि Mobile World Congress 2019 च्या आधी सॅंमसंग हे लॉन्च करू शकते. रुमर्स नुसार सॅमसंग S10 सिरीजचे तीन फोन्स लॉन्च करू शकते ज्यात Galaxy S10, Galaxy S10 Lite किंवा Galaxy S10 E आणि Galaxy S10+यांचा समावेश आहे. या फोन्स सोबत कंपनी 5G स्मार्टफोन पण लॉन्च करू शकते ज्याला Galaxy S10 E नाव दिले जाऊ शकते.

नुकत्याच लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार डिजाइन मध्ये Samsung Galaxy S10, S10 Lite आणि S10+ एक सारखे असू शकतात आणि तसेच यात पंच होल डिस्प्ले सह स्लिम बेजल्स पण असू शकतात. त्याचबरोबर बोलले जात आहे की फोन्स मध्ये कोणत्याही प्रकारची नॉच दिली जाणार नाही. रुमर्स पाहता यातील तीन फोन्स ड्यूल कॅमेरा सह येऊ शकतात आणि इतर फोन्स मध्ये तीन ते चार रियर कॅमेरा दिले जाऊ शकतात. टिपस्टर Evan Blass ने S10 सिरीजचा खुलासा केला आहे.

गॅलेक्सी S10, S10 Lite आणि S10+ च्या कॅमेऱ्याचा खुलासा

टिपस्टर ने Galaxy S10, S10+ and S10 Lite किंवा S10 E चे फोटो समोर आणले आहेत ज्यात फोन्सचे बॅक पॅनल दिसत आहेत आणि सोबतच कॅमेरा सेट-अप ची झलक पण मिळाली आहे. असे वाटते कि त्यातील दोन S10 फोन्स तीन कॅमेऱ्यांसह येऊ शकतात आणि S10 Lite मध्ये दोन रियर कॅमेरा दिले जाऊस शकतात. त्यामुळे अशा आहे कि चार कॅमेऱ्यांसह सॅमसंगचा 5G फोन येऊ शकतो.

Galaxy S10, S10 Lite किंवा S10+ वरून फोन्सची साइज पण समजते. आधीच्या लीक्सनुसार Galaxy S10 Lite मध्ये सर्वात छोटा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच S10+ मध्ये सर्वात मोठी स्क्रीन असू शकते. Galaxy S10 Lite 5.8-इंचाचा अमोल्ड डिस्प्ले, S10+  6.4-इंचाचा अमोल्ड डिस्प्ले आणि Galaxy S10 6.1-इंचाच्या डिस्प्ले सह येऊ शकतो.

रिपोर्ट्स नुसार Galaxy S10+ मध्ये 12GB RAM आणि 1TB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच काही लीक रिपोर्ट्स नुसार Galaxy S10+ 12GB RAM आणि 1TB स्टोरेज सह येऊ शकतो. Galaxy S10, S10 Lite आणि S10+ Exynos 9820 किंवा मग Snapdragon 855 चिपसेट ने सुसज्ज असू शकतो. भारतात सॅमसंग Exynos एडिशन मध्ये हे फोन्स लॉन्च करू शकते जे One UI आधारित Android Pie आऊट ऑफ द बॉक्स वर चालू शकतो.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :