Samsung Galaxy S10 मध्ये असू शकतो 10-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
सॅमसंग आपली Galaxy S10 सीरीज लवकरच लॉन्च करणार आहे, त्यामुळे लॉन्चच्या आधी अनेक रिपोर्ट्स समोर येत आहेत जे फोन्सच्या खास स्पेक्स आणि फीचरची माहिती देत आहेत. अलीकडेच आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन OIS सपोर्ट सह येऊ शकतो.
महत्वाचे मुद्दे:
- फोन मध्ये मिळू शकतो सिरेमिक ब्लॅक ऑप्शन
- 20 फेब्रुवारीला होऊ शकतो फोन लॉन्च
- सेल्फी कॅमेऱ्यात असेल OIS सपोर्ट
स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग या महिन्यात Samsung Galaxy S10 फोन्सच्या सीरीजचा खुलासा करणार आहे. तसेच लॉन्चच्या आधी याबद्दल अनेक रुमर्स आणि लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत. अधिकृत लॉन्चच्या आधीच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे कि Samsung Galaxy S10 स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर 10 मेगापिक्सलच्या सेल्फी सेंसर सह ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच यात सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण कंपनी देऊ शकते. विशेष म्हणजे 20 फेब्रुवारीला सॅन फ्रांसिस्को मध्ये Samsung Galaxy Unpacked 2019 इवेंट आयोजित केला गेला आहे जिथे या फोन्सचा खुलासा केला जाऊ शकतो.
तसेच GSMArena च्या आलेल्या रिपोर्टनुसार Samsung Galaxy S10 सीरीज मध्ये नव्या सुपर अमोलड डिस्प्ले टेक्नोलॉजीचा वापर केला जाऊ शकतो जी 10-बिट कलर प्रोसेसिंगला सपोर्ट करू शकते. यात ड्यूल पिक्सल ऑटोफोकस टेक्नॉलॉजी आणि 4K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट असू शकतो. इतकेच नव्हे तर, फोन मध्ये 4,100 एमएएच ची बॅटरी आणि रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
WinFuture रिपोर्ट्स नुसार Galaxy S10 रेंडर्सची एक गॅलेरी पब्लिश करण्यात आली आहे. लीक झालेल्या फोटोज मध्ये हँडसेट ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन रंगात दिसत आहे. एका वेगळ्या रेंडर मध्ये Galaxy S10+ स्मार्टफोन सिरेमिक ब्लॅक आणि प्रिजम ब्लॅक रंगात दिसत आहे. SlashLeaks नुसार फोन मध्ये 5.8 इंचाचा इनफिनिटी-ओ डिस्प्ले पॅनल असू शकतो.
लीक रिपोर्ट्स बद्दलच बोलायचे झाले तर सांगू इच्छितो कि SaudiAndroid नावाच्या एका ट्विटर अकाउंट वरून असे पण समजले आहे कि Samsung Galaxy S10 आणि Galaxy S10+ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो पण आता हे ट्वीट डिलीट झाले आहे.