मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने हल्लीच आपले दोन स्मार्टफोन्स गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 ला आपल्या चीन वेबसाइटवर लिस्ट केले आहे. गॅलेक्सी ऑन5 चे प्रोडक्ट पेज सध्यातरी उपलब्ध नाही आहे. मात्र आशा आहे की, कंपनी चीनमध्ये ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला लवकरच सादर करेल. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या भारतीय वेबसाइटवरसुद्धा ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला लिस्ट केले होते.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन7 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याला कंपनीच्या सपोर्ट साइटवर लिस्ट केले आहे. मात्र ह्या लिस्टिंगमध्ये ह्याची किंमत आणि त्याची उपलब्धता ह्याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. जर गॅलेक्सी ऑन 5 आणि गॅलेक्सी ऑन7 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याचे जास्तकरुन सर्व फीचर्स सारखेच आहे. दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे तो म्हणजे ह्याच्या स्क्रीनचा आकार. गॅलेक्सी ऑन5 मध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आहे, तर गॅलेक्सी ऑन 7 मध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्हीही हँडसेट HD रिझोल्युशन (720×1280 पिक्सेल) TFT टचस्क्रीनसह येतील. ह्यात 1.2GHz क्वाड-कोर एक्सनोस ३४७५ प्रोसेसरसह १.५ जीबीचा रॅम असेल.
ह्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट स्टोरेज 8GB आहे आणि ह्यात मायक्रो-एसडी कार्ड (१२८जीबी पर्यंत) साठी सपोर्ट आहे. गॅलेक्सी ऑन5 आणि गॅलेक्सी ऑन7 मध्ये अॅनड्रॉईडचा कोणता व्हर्जन असेल याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नाही. गॅलेक्सी ऑन 7 मध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा आहे. रियर कॅमे-यासोबत LED फ्लॅश दिला गेला आहे. आणि ह्याने आपण पुर्ण HD (1080पिक्सेल) रिझोल्युशनमध्ये व्हिडियो रेकॉर्ड करु शकाल.
तर गॅलेक्सी ऑन 5 मध्ये ८ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. आणि ह्याला आपण पुर्ण HD (१०८० पिक्सेल) रिझोल्युशनचे व्हिडियो रेकॉर्ड करु शकाल. हा स्मार्टफोन 4G LTE ला सपोर्ट करतो. ह्यात एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले गेले आहे. गॅलेक्सी ऑन 5 2600mAh बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटुथ, GPS, ग्लोनास, मायक्रो-USB, 3G, GPRS/एज आणि वायफाय ८०२.११ B/G/N फीचर आहे. हा हँडसेट ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.