Samsung Galaxy Note 9 to Launch On 9 August Media Invite Out: सॅमसंग ने आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन च्या लॉन्च बद्दल मीडिया ला निमंत्रण देणे पण सुरु केले आहे, हा डिवाइस 9 ऑगस्ट ला लॉन्च केला जाऊ शकतो. असे बोलले जात आहे की या दिवशी होणार्या आपल्या इवेंट मध्ये कंपनी कडून Samsung Galaxy Note 9 स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. असे पण बोलले जात आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला एक इम्प्रूव्ड S Pen मिळणार आहे, तसेच यात तुम्हाला एक मोठी बॅटरी पण मिळू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी Note 9 स्मार्टफोन बद्दल जी ही लॉन्च डेट समोर येत आहे, ती सर्वात आधी ब्लूमबर्ग च्या माध्यमातून समोर ठेवण्यात आली आहे, तसेच सॅमसंग चे हे मीडिया इनवाइट पण सांगत आहे की “प्रीमियम गॅलेक्सी फॅमिली मध्ये एका नवीन सदस्याचे स्वागत करा” या डिवाइस च्या इनवाइट चे टाइमिंग पण तुम्हाला आश्चर्यकारक वाटू शकते. आम्ही असे बोलत आहोत, कारण काही दिवसांपूर्वी हा डिवाइस US FCC कडून सर्टिफाइड करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी Note 9 स्मार्टफोन बद्दल अनेकदा माहिती समोर आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी Note 9 च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर यात एक इनफिनिटी डिस्प्ले 2.0 असू शकतो. हा डिस्प्ले सॅमसंग गॅलेक्सी S9 Duo मध्ये दिसला होता. त्याचबरोबर याच्या पिढी च्या मागच्या स्मार्टफोंस प्रमाणे यात पण तुम्हाला 6.3-इंचाचा S-AMOLED डिस्प्ले 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळू शकतो. सोबतच यात तुम्हाला एक्सीनोस 9810 आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर वाले वेगवेगळे वेरिएंट मिळू शकतात.
जसे की सॅमसंग गॅलेक्सी Note 8 स्मार्टफोन मध्ये आपण पाहिले होते यात आपल्याला एका 6GB च्या रॅम सह 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळणार आहेत. त्याचबरोबर यात तुम्हाला एक फिंगरप्रिंट स्कॅनर पण मिळू शकतो. पण Note 8 च्या तुलनेत याचा ड्यूल कॅमेरा सुधारलेला असू शकतो.
एंड्राइडहेडलाइन च्या एक रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास, कंपनी कडून न्यूयॉर्क मध्ये 2 किंवा 9 ऑगस्ट ला एका इवेंट मधुन हा डिवाइस लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या डिवाइस बद्दल आधी पण खुप काही समोर आले आहे आणि आम्हाला वर वर माहिती मिळाली आहे की या डिवाइस मध्ये कोणते स्पेक्स आणि फीचर्स सामील असतील. या सोबत डिजाईन बद्दल काही माहिती पण समोर आली आहे. आता काही दिवसांपूर्वी समोर आले होते की या डिवाइस मध्ये एक वेगळा कॅमेरा शटर बटन पण असू शकतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये एकूण 5 फिजिकल बटन्स असतील.