तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 डिवाइस बद्दल येणार्या अनेक लीक आणि रुमर्स मुळे परेशान झाले असाल. आज या डिवाइस बद्दल समोर आले आहे की यात एका मोठ्या बॅटरी व्यतिरिक्त फास्टर वायरलेस चार्जिंग पण असणार आहे. तसेच आता अजून एक नवीन लीक पण या डिवाइस बद्दल समोर समोर आला आहे ज्या नुसार हा डिवाइस एका नवीन कलर वेरिएंट मध्ये पण लॉन्च केला जाऊ शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी Note 9 च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर यात एक इनफिनिटी डिस्प्ले 2.0 असू शकतो. हा डिस्प्ले सॅमसंग गॅलेक्सी S9 Duo मध्ये दिसला होता. त्याचबरोबर याच्या पिढी च्या मागच्या स्मार्टफोंस प्रमाणे यात पण तुम्हाला 6.3-इंचाचा S-AMOLED डिस्प्ले 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळू शकतो. सोबतच यात तुम्हाला एक्सीनोस 9810 आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर वाले वेगवेगळे वेरिएंट मिळू शकतात.
जसे की सॅमसंग गॅलेक्सी Note 8 स्मार्टफोन मध्ये आपण पाहिले होते यात आपल्याला एका 6GB च्या रॅम सह 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळणार आहेत. त्याचबरोबर यात तुम्हाला एक फिंगरप्रिंट स्कॅनर पण मिळू शकतो. पण Note 8 च्या तुलनेत याचा ड्यूल कॅमेरा सुधारलेला असू शकतो.
एंड्राइडहेडलाइन च्या एक रिपोर्ट वर विश्वास ठेवल्यास, कंपनी कडून न्यूयॉर्क मध्ये 2 किंवा 9 ऑगस्ट ला एका इवेंट मधुन हा डिवाइस लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या डिवाइस बद्दल आधी पण खुप काही समोर आले आहे आणि आम्हाला वर वर माहिती मिळाली आहे की या डिवाइस मध्ये कोणते स्पेक्स आणि फीचर्स सामील असतील. या सोबत डिजाईन बद्दल काही माहिती पण समोर आली आहे. आता काही दिवसांपूर्वी समोर आले होते की या डिवाइस मध्ये एक वेगळा कॅमेरा शटर बटन पण असू शकतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये एकूण 5 फिजिकल बटन्स असतील.