Samsung Galaxy Note 9 512GB स्टोरेज आणि 8GB रॅम सह केला जाऊ शकतो लॉन्च
सॅमसंग गॅलेक्सी Note 9 डिवाइस जुलै च्या शेवटी लॉन्च केला जाऊ शकतो, हा डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी S9 ची जागा घेणार आहे.
तुम्हाला असा नाही वाटत कोणत्याही डिवाइस मध्ये 256GB ची स्टोरेज असणे मोठी बाब आहे, एवढ्या स्टोरेज मध्ये तुम्ही तुमच्या फोन मध्ये काय काय सेव करू शकता. पुन्हा एकदा विचार करा की ही स्टोरेज तुम्हाला पुरेल की नाही ते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला साठी एवढी स्टोरेज पुरणार नसेल तर सॅमसंग लवकरच एका नवीन डिवाइस सह बाजारत येणार आहे, हा डिवाइस सॅमसंग गॅलेक्सी Note 9 नावाने समोर येईल आणि हा डिवाइस 512GB स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाण्याची बातमी येत आहे.
हा डिवाइस 8GB रॅम सह लॉन्च केला जाणार असल्याची बातमी येत आहे. याची माहिती प्रसिद्ध टिपस्टर @Ice Universe च्या माध्यामातून समोर येत आहे, एक ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही हे ट्विट इथे बघू शकता.
या आधी आलेल्या काही लीक्स आणि रुमर्स नुसार स्मार्टफोन मध्ये एक इनफिनिटी डिस्प्ले 2.0 असू शकतो. हा डिस्प्ले सॅमसंग गॅलेक्सी S9 Duo मध्ये दिसला होता. तसेच यात आधीच्या स्मार्टफोंस प्रमाणे यात पण तुम्हाला 6.3-इंचाचा S-AMOLED डिस्प्ले 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो सह मिळू शकतो. तसेच यात तुम्हाला एक्सीनोस 9810 आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर वाले वेगवेगळे वेरिएंट मिळू शकतात.
जसे की सॅमसंग गॅलेक्सी Note 8 स्मार्टफोन मध्ये बघितले होते यात पण तुम्हाला एक 6GB च्या रॅम सह 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळणार आहेत. तसेच यात तुम्हाला एक फिंगरप्रिंट स्कॅनर पण मिळेल. पण Note 8 पेक्षा याचा ड्यूल कॅमेरा चांगला असेल.
नोट: फीचर्ड इमेज काल्पनिक आहे.