सॅमसंग चा पुढील फ्लॅगशिप डिवाइस, सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, 9 ऑगस्ट 2018 ला लॉन्च होणार असल्याची अफवा आहे. स्मार्टफोन आता 360 डिग्री च्या रेंडर वीडियो मध्ये लीक झाला आहे, ज्या वरून आपल्याला याच्या डिजाइन बद्दल माहिती मिळत आहे. नोट 9 चे टिपस्टर @ओनलिक्स ने CAD रेंडर 91 mobiles च्या मदतीने पोस्ट केले आहेत आणि यावर विश्वास ठेवल्यास हा डिवाइस आधीच्या डिवाइस च्या तुलनेत डिजाईन मध्ये जास्त बदल न करता सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह दिसत आहे.
गॅलेक्सी नोट 9 मध्ये Samsung ने गॅलेक्सी नोट 8 च्या बटन प्लेसमेंट तश्याच ठेवल्या आहेत. रेंडर डिवाइस च्या डाव्या किनार्यावर वॉल्यूम रॉकर्स आणि पावर बटन आहेत, तर बिक्सबी बटन उजव्या किनार्यावर आहे. आशा आहे की कंपनी यावेळी यूजर्सना बिक्सबी बटन रीमॅप करण्याची परवानगी देईल.
पुढे पाहता, एक स्पीकर ग्रिल सह खाली एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे आणि असे वाटते आहे की कंपनी 3.5 मिमी ऑडियो जॅक काढून टाकणार नाही. हँडसेट च्या मागच्या पॅनल वर सर्वात उल्लेखनीय बदल दिसत आहेत, फिंगरप्रिंट सेंसर गॅलेक्सी एस 9 प्रमाणे मध्ये ठेवण्यात आला आहे. मागे असलेला फिंगरप्रिंट सेंसर मुळे आधीच्या रिपोर्ट नुसार डिवाइस वर एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
गॅलेक्सी नोट 9 चे डायमेंशन 161.9×76.3 मिमी असतील. पण नोट 8 मधील 8.6 मिमी च्या तुलनेत हँडसेट 8.8 मिमी वर ha थोडा जाडा वाटू शकतो. स्क्रीन चा आकार 6.3-इंच लांब 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या क्यूएचडी+रिजॉल्यूशन सह येण्याची शक्यता आहे. डिवाइस काही ठिकाणी कंपनी च्या फ्लॅगशिप एक्सिनोस 9810 एसओसी आणि इतर ठिकाणी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 एसओसी वर चालेल.
जिथे हा लॉन्च केला जाईल त्यानुसार, स्मार्टफोन 6 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज सह येईल. स्मार्टफोन बद्दल एक अपग्रेड केलेली कॅमेरा सिस्टम ची सुविधा असल्याची अफवा आहे आणि आम्हाला वाटते की एस 9 ची वेरियेबल अपर्चर सुविधा नोट 9 वर पण दिसू शकते. यावेळी मागच्या डिवाइस ला आलेल्या अडचणी सोडवता याव्यात म्हणून यात 3880 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.