Samsung चांगले स्मार्टफोंस बनवण्यासाठी ओळखली जाते पण Samsung च्या फोंस मध्ये नेहमीच एक कमतरता जाणवते आणि ती म्हणजे याची बॅटरी. Samsung च्या फोंस मध्ये नेहमीच कमी कपॅसिटी ची बॅटरी मिळते जी इतर स्मार्टफोन निर्मात्यांशी प्रतिस्पर्धा करण्यासाठी पूरे नाही.
पण, आता असे वाटत आहे की यूजर्स च्या तक्रारी पाहून कंपनी ने यावर काम सुरू केले आहे आणि अफवा येत आहे की आगामी Galaxy Note 9 मध्ये एक मोठी बॅटरी असेल.
मागच्या वर्षी Samsung Galaxy Note 8 3300mAh च्या बॅटरी सह लॉन्च करण्यात आला होता पण त्याआधी आलेल्या रुमर्स नुसार अंदाज लावला जात होता कि या डिवाइस मध्ये 3850mAh ची बॅटरी असेल. पण आता आलेल्या अफवे वर विश्वास ठेवल्यास Samsung च्या आगामी फ्लॅगशिप डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी असेल. जर ही अफवा खरी ठरली तर ही आता पर्यंत ची सर्व Galaxy मॉडेल्स मधील बॅटरी मध्ये सर्वात मोठी बॅटरी असेल. जर असे झाले तर Samsung बाजारात चांगली पकड बनवू शकेल.
एका दुसर्या रुमर नुसार Galaxy Note 9 मध्ये 6 इंचाचा डिस्प्ले असेल. Note 9 मध्ये मजबूत फ्रेम आणि ग्लास असेल, त्याचबरोबर डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे. पण अजूनही हे स्पष्ट झाले नाही की या डिवाइस मध्ये पारंपरिक रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर येईल की इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर. या डिवाइस मध्ये एक्सिनोस 9810 आणि स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल आणि यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल.
Samsung या डिवाइस मध्ये पण डुअल कॅमेरा सेटअप कायम ठेऊ शकते जी काही आश्चर्य कारक बाब नाही. डिवाइस च्या लॉन्च च्या आधी याचे अजून फीचर्स तसेच स्पेसिफिकेशन्स समोर येऊ शकतात.
फीचर्ड इमेज Galaxy Note 8 ची आहे.