सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये मेटल बॉडी असेल. हा डिवाइस 5.8 इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येईल. ह्यात एक QHD रिझोल्युशन असलेली डिस्प्ले असू शकते.
सॅमसंग लवकरच आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी नोट 7 एज लाँच करु शकतो. ह्याआधू ह्या स्मार्टफोनविषयी अनेक लीक्स समोर आले, ज्याच्या माध्यमातून ह्या स्मार्टफोनविषयी काही ना काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहिली. आता ह्या स्मार्टफोनविषयी एक नवीन खुलासा समोर आला आहे, ज्यात असा दावा केला आहे की, हा नवीन डिवाइस ड्यूल कॅमेरा सेटअपने सुसज्ज असू शकतो. ह्या स्मार्टफोनच्या लाँच डेटविषयीही काही माहिती समोर आली आहे. ज्यात असे सांगण्यात येत आहे की, हा डिवाइस ऑगस्ट महिन्यात लाँच होऊ शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये मेटल बॉडी असेल. हा डिवाइस 5.8 इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येईल. ह्यात एक QHD रिझोल्युशन असलेली डिस्प्ले असू शकते. हा स्नॅपड्रॅगन आणि Exynos व्हर्जनमध्ये लाँच होऊ शकतो. ह्यात 6GB ची रॅमसुद्धा असू शकते आणि हा 4000mAh च्या बॅटरीही असू शकते.