सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 स्मार्टफोनच्या किंमतीत झाली खूप मोठी घट
आता आपण कंपनीच्या ऑनलाइन स्टोरवरुन ह्या फोनच्या 32GB व्हर्जनला ४२,९०० रुपयात आणि 64GB व्हर्जनला ४८,९०० रुपयात खरेदी करु शकता.
सॅमसंगने सप्टेंबर २०१५ मध्ये भारतात गॅलेक्सी नोट 5 स्मार्टफोन लाँच केला होता. भारतात ह्या फोनचे दोन व्हर्जन लाँच झाले होते. 32GB आणि 64GB. ह्या स्मार्टफोनची किंमत भारतात क्रमश: ५३,९०० रुपये आणि ५९,९०० रुपये होती. मात्र आता कंपनीने आपल्या ह्या फोनची किंमत कमी केली आहे. आता आपण कंपनीच्या ऑनलाइन स्टोरवर ह्या फोनच्या 32GB व्हर्जनला ४२,९०० रुपयात आणि 64GB व्हर्जनला ४८,९०० रुपयात खरेदी करु शकता. ह्याचे 32GB व्हर्जन सोनेरी, काळा आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे तर 64GB व्हर्जन केवळ सोनेरी रंगात उपलब्ध आहे.
जर सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्ले रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेल आहे. फोनमध्ये एक्सीनोस 7 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 4GB रॅम दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 16MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
हेदेखील पाहा – ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट
हेदेखील वाचा – आयफोन SE, आयपॅड प्रो आता अधिकृतरित्या भारतात उपलब्ध
हेदेखील वाचा – ५००० च्या किंमतीत येणारे दोन बजेट स्मार्टफोन्स