Samsung Galaxy Note 10 चा कोडनेम असू शकतो Da Vinci

Updated on 12-Sep-2018
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Note 10 च्या कोडनेम वरून इम्प्रूव्ड S Pen कडे पण इशारा होत असू शकतो. अजूनतरी डिवाइस च्या प्राइस किंवा स्पेक्स बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

गेल्याच महिन्यात सॅमसंग ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 9 लॉन्च केला होता पण आता पुढल्या वर्षीच्या फ्लॅगशिप Galaxy Note 10 बद्दल लीक्स यायला सुरुवात झाली आहे. 

कोरियन मीडिया The Bell नुसार, सॅमसंग ने आपल्या 2019 च्या फ्लॅगशिप फॅबलेट साठी नाव निवडले आहे. Galaxy Note 10 ला “Da Vinci” नाव देण्यात आले आहे, ज्यावरून अधिक इम्प्रूव्ड S Pen चे संकेत मिळत आहेत. Galaxy Note 10 बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही आणि अजूनही या फोनच्या लॉन्च साठी जवळपास एक वर्षाचा अवधी आहे. 

Samsung च्या सध्याचा फ्लॅगशिप Galaxy Note 9 च्या बेस मॉडेल ची किंमत 67,900 रूपये आहे ज्यात 128GB स्टोरेज आहे आणि याच्या टॉप वेरिएंट ची किंमत 84,900 रूपये आहे जो 512GB च्या स्टोरेज सह येतो. 

Note 9 च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 6.4 इंचाचा QHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो एक इंफिनिटी डिस्प्ले आहे आणि याचे रेजोल्यूशन 2960 x 1440 पिक्सल आहे. डिवाइस च्या कडेला डेडीकटेड बिक्स्बी बटन पण देण्यात आले आहे. जो कंपनीचा वॉइस बेस्ड असिस्टेंट आहे, जो थोडा बदललेला आहे. डिवाइस चार रंगात म्हणजे, ओशेयन ब्लू, लवेंडर पर्पल, मेटॅलिक कॉपर आणि मिडनाइट ब्लॅक रंगात सादर करण्यात आला आहे. 

इतर Galaxy Note लाइनअप प्रमाणे हा डिवाइस पण S पेन सोबत येतो. S पेन मध्ये ब्लुटूथ क्नेक्टिविटी देण्यात आली आहे.  Note 9 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रॉसेसर आणि 8GB रॅम आहे. भारतीय वर्जन मध्ये एक्सिनोस 9810 प्रॉसेसर असेल. हा सॅमसंग चा पहिला असा फोन आहे जो 512 GB स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 512 GB पर्यंत वाढवता येईल. डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायर्लेस चार्जिंग ला सपोर्ट करते. 

ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर Note 9 मध्ये 12MP+12MP चा ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे आणि दोन्ही कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS)सोबत येतात. तसेच दोन्ही कॅमेरा ऑटो सीन डिटेक्शन सह येतात. सेल्फी साठी डिवाइस मध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :