प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा नवा फोन Samsung Galaxy M55s 5G अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याच्या पुढील आणि मागील कॅमेऱ्यांमधून रेकॉर्डिंग करता येईल. फोटोग्राफीसाठी, यात 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. Samsung Galaxy M55s 5G भारतीय बाजारपेठेत Xiaomi, Oppo आणि Realme च्या फोन्सना जबरदस्त स्पर्धा देणार आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy M55s 5G ची किंमत आणि सर्व तपशील-
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने वर सांगितल्याप्रमाणे नवा फोन लाँच केला आहे. नव्या Samsung Galaxy M55S ची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या किमतीत 2000 रुपयांची सूट देखील समाविष्ट आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Amazon India वर 26 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल. Samsung Galaxy M55S थंडर ब्लॅक आणि कोरल ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M55s 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेमध्ये पंच-होल कटआउट मिळेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा डिव्हाइस Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनमध्ये 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. नवीन स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर्स मिळतील.
फोटो क्लिक करण्यासाठी नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करेल. त्याबरोबरच, या सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये ड्युअल रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार आहे. सविस्तर सांगायचे झाल्यास, याद्वारे तुम्ही रियर आणि फ्रंट कॅमेरा व्हिडिओद्वारे एकाच वेळी रेकॉर्ड करता येईल. तसेच, नाईट फोटोग्राफी आणि नो-शेक कॅम मोड सारखे कॅमेरा स्पेक्स देखील असतील. फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
फोनमधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळणार आहेत.