Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M55 5G आणि Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोन भारतात लाँच

Samsung Galaxy M15 5G चे प्री-बुकिंग आधीच सुरू झाले होते.

दोन्ही फोनवर HDFC बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट

Samsung ने Samsung Galaxy M55 5G आणि Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. भारतीय बाजारपेठेत Galaxy M सीरीजचे अनेक उत्तम स्मार्टफोन आहेत. हे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. दरम्यान, आज कंपनीने या सिरीजमध्ये दोन नवीन हँडसेट समाविष्ट केले आहेत.

हे दोन्ही स्मार्टफोन समान डिझाइनसह आणले गेले आहेत. स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट उपलब्ध आहे. हँडसेट फ्लॅट एजसह येतो. जाणून घेऊयात फोनची किंमत, उपलब्धता आणि सर्व तपशील-

Samsung Galaxy M55 5G
Samsung Galaxy M55

Samsung Galaxy M55 5G ची किंमत

Samsung Galaxy M55 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. यात 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह फोनचा वेरिएंट 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनचे टॉप मॉडेल 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज 32,999 रुपयांना आले आहे. हा फोन लाईट ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शन्स आणण्यात आला आहे

Samsung Galaxy M15 5G ची किंमत

Samsung Galaxy M15 5G फोन 4GB रॅम आणि 128GB वेरिएंटसह 13,299 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह हा व्हेरिएंट 14,799 रुपयांना येतो. हा फोन सेलेस्टाइन ब्लू, स्टोन ग्रे आणि ब्लू टोपाझ या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

उपलब्धता

हे दोन्ही फोन Amazon आणि Samsung च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. Samsung Galaxy M15 5G चे प्री-बुकिंग आधीच सुरू झाले होते. दोन्ही फोनवर HDFC बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. याशिवाय, यामध्ये मोफत चार्जरही दिला जात आहे.

Samsung Galaxy M15 5G pre-booking in India begins
Samsung Galaxy M15 5G pre-booking in India begins

Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G चे टॉप 5 फीचर्स

डिस्प्ले

Samsung Galaxy M55 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ सुपर AMOLED प्लस डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Galaxy M15 5G फोनमध्ये 6.5 इंच FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे.

प्रोसेसर

Samsung Galaxy M55 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह आणला गेला आहे. तर, Galaxy M15 5G फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेट सह येतो.

स्टोरेज

Samsung Galaxy M55 5G स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम असून 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तर, Galaxy M15 5G फोनमध्ये 6GB पर्यंत रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे.

कॅमेरा

Samsung Galaxy M55 5G फोटोग्राफीसाठी फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M15 5G हा स्मार्टफोन 50MP मुख्य, 5MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह येतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या डिव्हाइसमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

Samsung Galaxy M55 5G या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. तर, Galaxy M15 5G फोनमध्ये या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo