प्रसिद्ध साऊथ कोरिया स्मार्टफोन निर्माता Samsung टेक विश्वात नेहमीच चर्चेचा विषय असते. आता फोनच्या आगामी Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G स्मार्टफोन्सच्या लाँच डेटची पुष्टी झाली आहे. कंपनीने नुकतेच ब्राझीलमध्ये हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यानंतर आता हे दोन्ही फोन भारतात देखील सादर केले जाणार आहेत. त्याबरोबरच, कंपनीने आगामी फोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी देखील केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G चे सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: जबरदस्त फीचर्ससह Realme 12x 5G फोन भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत? बघा सर्व डिटेल्स। Tech News
वर सांगितल्याप्रमाणे, अखेर कंपनीने Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy M15 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. हे दोन्ही फोन भारतात 8 एप्रिल रोजी लाँच केले जातील. लॉन्च होण्यापूर्वी फोनची समर्पित मायक्रोसर्व्हिस Amazon आणि Samsung वर Live देखील झाली आहे. यासह फोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील पुढे आले आहेत.
Samsung Galaxy M55 च्या ग्लोबल मॉडेलनुसार, या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा सुपर AMOLED प्लस इन्फिनिटी-O डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याव्यतिरिक्त, फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 (4nm) प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50MP फ्रंट कॅमेरा आहे. तर, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
दुसरीकडे, Samsung Galaxy M15 5G फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा FHD+ Infinity-V सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, फोन ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ 6nm प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह, फोनला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.