Limited Time Deal! Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy F55 5G ची किंमत 4000 रुपयांनी कमी, बघा ऑफर

Updated on 10-Jul-2024
HIGHLIGHTS

Samsung चे लेटेस्ट F आणि M सिरीज स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी संधी

Samsung Galaxy M55 5G मॉडेलची किंमत 4 हजार रूपयांनी स्वस्त

Samsung Galaxy F55 5G ची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

जर तुम्ही Samsung लव्हर असाल तर आज वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Samsung Galaxy Unpacked Event आयोजित करण्यात आला आहे. मात्र, Samsung लव्हर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेले Samsung चे F आणि M सिरीज स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

होय, कंपनीने आपल्या Samsung Galaxy M55 5G मॉडेलची किंमत 4 हजार रूपये आणि Samsung Galaxy F55 5G ची किंमत 2 हजार रुपयांनी कमी केली आहे. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध असणार आहे. तुम्ही 9 ते 13 जुलैपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. दोन्ही फोनवर ही ऑफर रिटेल आउटलेट आणि काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म लागू केली जात आहे. चला तर मग जाणून घेउयात या फोनची नवीन किंमत-

Samsung galaxy M55 5G वरील ऑफर आणि किंमत

  • Samsung Galaxy M55 5G फोनची लाँच प्राईस 26,999 रुपये होती. आता 4 हजार रुपयांच्या कपातीनंतर तुम्ही फोनचे बेस म्हणजेच 8GB रॅम+128GB स्टोरेज वेरिएंट 22,999 रुपयांना खरेदी करू शकता.
  • तर, फोनचा 8GB + 256GB स्टोरेज पर्याय 25,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन 29,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.
  • याव्यतिरिक्त, फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट म्हणजेच 12GB + 256GB स्टोरेज 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 32,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.

Samsung galaxy F55 5G वरील ऑफर आणि किंमत

samsung galaxy f55 5g
  • Samsung Galaxy F55 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटवर 2 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर हा फोन 24,999 रुपयांना मिळत आहे. या फोनची लाँच किंमत 26,999 रुपये होती.
  • फोनचा 8GB + 256GB स्टोरेज पर्याय 27,999 रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. कंपनीने स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये लाँच केला होता.
  • फोनचा टॉप 12GB+256GB व्हेरिएंट 30,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीने लाँचच्या वेळी या फोनची किंमत 32,999 रुपये इतकी निश्चित केली होती.

Samsung Galaxy M55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M55 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हे एक सुपर AMOLED + पॅनेल आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅक पॅनलला ट्रिपल रीअर OIS तंत्रज्ञान दिलेले आहे, त्यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F55 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.7 इंच लांबीचा HD Plus सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेट वापरण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50MP OIS कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :