जबरदस्त Samsung Galaxy M35 5G भारतात लाँच, बजेट किमतीत मिळतील 6000mAh बॅटरीसारखे फीचर्स 

जबरदस्त Samsung Galaxy M35 5G भारतात लाँच, बजेट किमतीत मिळतील 6000mAh बॅटरीसारखे फीचर्स 
HIGHLIGHTS

लेटेस्ट Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन भारतात लाँच

Samsung ने नवा स्मार्टफोन बजेट विभागात सादर केला आहे.

Amazon प्राइम डे सेल दरम्यान 20 जुलैपासून Samsung Galaxy M35 5G फोनची सेल भारतात सुरू होणार

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung ने भारतात आपला नवा Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीच्या M-सिरीजचा हा एक नवीन स्मार्टफोन आहे. मुख्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Galaxy M35 5G मध्ये शक्तिशाली 50MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये जलद चार्जिंगसह 6000mAh जंबो बॅटरी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन Samsung फोन Xiaomi, Realme, Vivo आणि Oppo सारख्या ब्रँडच्या फोन्सना टक्कर देईल. जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Itel चा नवा 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी, अप्रतिम ऑफर्स उपलब्ध

Samsung Galaxy M35 5G ची भारतीय किंमत

Samsung ने Samsung Galaxy M35 5G ची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मूनलाइट ब्लू, डेब्रेक ब्लू आणि थंडर ग्रे कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon प्राइम डे सेल दरम्यान 20 जुलैपासून या फोनची सेल भारतात सुरू होणार आहे.

Samsung Galaxy M35
#Samsung Galaxy M35

Samsung Galaxy M35 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M35 5G या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या मोबाइल फोनमध्ये Exynos 1380 SoC आणि Mali G68 MP5 GPU आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये वेपन कूलिंग चेंबर देखील आहे, ज्याद्वारे तुमचा फोन लवकर गरम होणार नाही. त्याबरोबरच, हा फोन नवीनतम Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.

फोटोग्राफीसाठी, या नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 25W फास्ट चार्जिंगसह यात 6,000mAh जंबो बॅटरी आहे. इतर फीचर्सबद्दल बोलयचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo