Price Cut! Samsung Galaxy M35 5G लाँच केल्यानंतर लगेच M34 5G झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Price Cut! Samsung Galaxy M35 5G लाँच केल्यानंतर लगेच M34 5G झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
HIGHLIGHTS

amsung ने मागील वर्षी Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला होता.

Samsung Galaxy M34 5G च्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy M34 5G फोन 5nm Exynos 1280 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Samsung ने नुतकेच Galaxy M35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीन बजेट स्मार्टफोन आहे. नावावरून समजलेच असेल की, हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Samsung Galaxy M34 5G चा सक्सेसर आहे. दरम्यान, नवीन स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनीने आता आपल्या जुन्या मॉडेलची किमतीत कपात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M34 5G ची नवी किंमत-

Samsung Galaxy M34 5G च्या किमतीत कपात

Samsung ने मागील वर्षी Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोनचा 6GB रॅम + 128GB व्हेरिएंट 16,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. तर, फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. वर सांगितल्याप्रमाणे, आता हा फोन 2000 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. कपातीनंतर, तुम्ही हा फोन अनुक्रमे केवळ 14,999 रुपये आणि 16,999 रुपयांना खरेदी करता येईल.

लेटेस्ट Samsung 5G फोनवर तब्बल 2000 रुपयांची कपात

Samsung Galaxy M34 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन 5nm Exynos 1280 प्रोसेसरने सुसज्ज आहे. लक्षात घ्या की, Exynos 1280 चे 5G मॉडेम तुम्ही तुमच्या फोनवर करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला खूप जलद गती देतो. यात हाय कॉलिटीच्या व्हिडिओ कॉलपासून ते इमर्सिव्ह मोबाइल गेमिंगपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनसोबत 8GB रॅम उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच, यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP तिसरा कॅमेरा आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी,या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo