Samsung Galaxy M34 5G: Samsung ने जूनच्या सुरुवातीला Galaxy M34 5G वर 4,000 रुपयांची किंमत कमी केली होती. ही कपात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून फोन खरेदी केल्यास उपलब्ध आहे. मात्र, आता ब्रँड ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर देखील किमतीत कपात करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन ऑफरनंतर रिटेल स्टोअर्सवर या फोनवर 6,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy M34 5G ची किंमत आणि सविस्तर माहिती-
Samsung चा हा फोन 8GB RAM + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल्ससह भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या फोनवर 6,000 रुपयांची सूट जाहीर केली गेली आहे. ही ऑफर ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल. किमतीत कपात केल्यानंतर, फोनची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये, 12,999 रुपये आणि टॉप मॉडेल 15,999 रुपयांना उपलब्ध होईल. पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन मोडवर आजही 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
Samsung Galaxy M34 5G मध्ये 6.46-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यासह 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये तुम्हाला पॉवरफुल Exynos 1280 प्रोसेसर आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 8GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB RAM प्लस फीचर आहे. यासह तुम्हाला फोनमध्ये 16GB रॅम पर्यंत पॉवर उपलब्ध आहे.
फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy M34 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50MP प्रायमरी, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP सेकंडरी लेन्स बसवण्यात आले आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 13MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये Dual 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth, NFC असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.