digit zero1 awards

नव्या फीचर्ससह नव्या अवतारात आला Samsungचा लोकप्रिय 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स। Tech News 

नव्या फीचर्ससह नव्या अवतारात आला Samsungचा लोकप्रिय 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स। Tech News 
HIGHLIGHTS

भारतात मिड-बजेट 5G फोन Samsung Galaxy M34 5G चा नवा व्हेरिएंट लाँच

8GB रॅमसह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,499 रुपये आहे.

सणासुदीच्या हंगामात Samsung या फोनवर 1,500 रुपयांची सूट देखील देत आहे.

Samsung ने यावर्षी म्हणजेच जुलै 2023 मध्ये त्यांच्या ‘M’ सिरीजअंतर्गत भारतात मिड-बजेट 5G फोन Samsung Galaxy M34 5G लाँच केला. कमी कालावधीच हा फोन खूप लोकप्रिय झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन सध्या 6GB RAM / 8GB RAM व्हेरिएंटसह 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. पण आता कंपनीने डिवाइसचा आणखी एक नवीन 256GB स्टोरेज व्हेरिएंट बाजारात आणला आहे. चला तर मग या फोनवर उपलब्ध किंमत आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: LAVA चा स्वस्त 5G फोन भारतात होणार लाँच, कंपनीकडून Blaze 2 5G टीजर जारी, बघा काय मिळेल विशेष!

Samsung Galaxy M34 5G किंमत

Samsung Galaxy M34 5G फोनचा नवीन वेरिएंट म्हणजे 8GB रॅमसह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,499 रुपये आहे. लक्षात घ्या की, यापूर्वी लाँच झालेले 8GB + 128GB व्हेरिएंट आणि 6GB + 128GB व्हेरिएंट अनुक्रमे 18,499 रुपये आणि 16,499 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या दिवसांत म्हणजेच सणासुदीच्या हंगामात Samsung या फोनवर 1,500 रुपयांची सूट देखील देत आहे. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत साईटला भेट द्या.

SAMSUNG GALAXY M34 5G
Samsung Galaxy m34 5g

Samsung Galaxy M34 5G

या 5G फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा फुल HD + वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. ही स्क्रीन सुपर AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह संरक्षित करण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी Samsung Galaxy M34 5G मध्ये ब्रँडचा स्वतःचा Exynos 1280 octacore प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे.

Samsung चे फोन्स फोटोग्राफीसाठी अप्रतिम मानले जातात. , Galaxy M34 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. यात F/1.8 अपर्चरसह 50MP चा प्रायमरी सेन्सर, F/2.2 अपर्चरसह 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. एवढेच नाही तर, मागील कॅमेरा OIS टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी F/2.0 अपर्चरसह 13MP सेल्फी सेन्सर फ्रंट पॅनलवर देखील प्रदान केला आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी यात 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी, फोन 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, या फोनमध्ये फूल चार्ज केल्यानंतर 2 दिवसांचा बॅकअप देण्याची क्षमता असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo