Price drop: Samsung च्या लेटेस्ट 5G फोनवर मिळतेय, डील अजिबात चुकवू नका

Price drop: Samsung च्या लेटेस्ट 5G फोनवर मिळतेय, डील अजिबात चुकवू नका
HIGHLIGHTS

Amazon ने Samsung Galaxy M33 5G च्या किमतीत मोठी घट केली आहे.

या फोनवर तुम्हाला संपूर्ण 29% सवलत देण्यात येत आहे.

यासह 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे.

Samsung Galaxy M33 5G: साऊथ कोरियाची कंपनी Samsung चे फोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम ऑफर आहे. होय, Amazon ने Samsung Galaxy M33 5G च्या किमतीत मोठी घट केली आहे. आता तुम्हाला हा स्मार्टफोन आणखी वाजवी दरात खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन्स खरेदी करण्यापूर्वी तुम्ही यावरील ऑफर्सबद्दल जाणून घ्या. 

Samsung Galaxy M33 5G ची किंमत 

हा एक मिड रेंज स्मार्टफोन आहे. Amazon वर Samsung Galaxy M33 5G फोनची MRP 25, 999 रुपये आहे. मात्र, या फोनवर तुम्हाला संपूर्ण 29% सवलत देण्यात येत आहे. या सवलतीसह स्मार्टफोन साईटवर केवळ 18,499 रुपयांना सूचिबद्ध आहे. मात्र, एवढेच नाही तर यावर ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. याद्वारे तुम्ही हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. 

Samsung Galaxy M33 5G वरील ऑफर्स 

 सॅमसंग 5G स्मार्टफोनवर प्रचंड एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करत असाल तर या ऑफर अंतर्गत तुम्हाला 17,050 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. मात्र, लक्षात घ्या की ही सूट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असणार आहे, याद्वारे एक्सचेंज व्हॅल्यू ठरवली जाणार आहे. 

 Samsung Galaxy M33 5G चे मुख्य तपशील 

  Samsung Galaxy M33 5G 6.6 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. यात Exynos 1280 प्रोसेसर मिळेल. यासह 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. याशिवाय, फोटोग्राफीसाठी डिव्हाइसमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह क्वाड कॅमेरा सेटअप आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा मिळत आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये यात 6000mAh बॅटरी मिळणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo