Samsung Galaxy M15 5G Prime Edition: तब्बल 6000mAh बॅटरीसह नवा फोन लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 26-Sep-2024
HIGHLIGHTS

Samsung चा Samsung Galaxy M15 5G Prime Edition लाँच

Samsung Galaxy M15 5G प्राइम एडिशनची सुरुवातीची किंमत 13,499 रुपये

फोटोग्राफीसाठी या Samsung फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने भारतात आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy M15 5G Prime Edition लाँच केला आहे. या फोनचे प्राईम एडिशन कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये लाँच केले आहे. कमी किमतीत फोनमध्ये भारी फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. तर, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy M15 5G Prime Edition फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित संपूर्ण तपशील-

Also Read: Vivo V40e 5G: बहुप्रतीक्षित फोन 50MP सेल्फी कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

Samsung Galaxy M15 5G Prime Edition ची किंमत

Samsung Galaxy M15 5G प्राइम एडिशन फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यासह, 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. अखेर, फोनचा 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंट 16,499 रुपये किमतीसह येतो. हा फोन ब्लू टोपाज, सेलेस्टियल ब्लू आणि स्टोन ग्रे कलर ऑप्शन्समध्ये सादर केला गेला आहे.

फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, डिस्काउंट ऑफरनंतर हा फोन 10,999 रुपये, 11,999 रुपये आणि 13,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन तुम्ही प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon आणि अधिकृत Samsung वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी करण्यास सक्षम असाल.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition

नव्या Samsung Galaxy M15 5G प्राइम एडिशन फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ Infinity-V सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅम व्हेरिएंट उपलब्ध आहेत. तर, फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळेल, जे मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition

याव्यतिरिक्त, Samsung Galaxy M15 5G Prime Edition मध्ये फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. सेल्फीचे शौकीन असलेल्या लोकांसाठी हा फोन उत्तम आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :