Samsung Galaxy M15 5G चे प्री-बुकिंग सुरू, फक्त 999 रुपयांमध्ये मिळवा आकर्षक बेनिफिट्स। Tech News 

Samsung Galaxy M15 5G चे प्री-बुकिंग सुरू, फक्त 999 रुपयांमध्ये मिळवा आकर्षक बेनिफिट्स। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोन भारतात 8 एप्रिल रोजी लाँच होणार

कंपनीने Amazon वर Samsung Galaxy M15 5G फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे.

प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांना अप्रतिम बेनिफिट्स मिळतील.

Samsung चा Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोन भारतात 8 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. कंपनीने अलीकडेच या फोनची लाँच डेट जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लाँच होण्यापूर्वी कंपनीने आता या फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे. फोनच्या खरेदीवर प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना काही आकर्षक फायदे मिळणार आहेत. त्याबरोरबच, Samsung Galaxy M15 5G फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon वर थेट झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात संपूर्ण तपशील-

हे सुद्धा वाचा: एअर जेश्चर सपोर्टसह येणाऱ्या Realme 12x 5G ची Special Sale भारतात आज, बघा Best ऑफर्स। Tech News

samsung galaxy m15 5g

Samsung Galaxy M15 5G फोनचे प्री-बुकिंग ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने Amazon वर Samsung Galaxy M15 5G फोनची प्री-बुकिंग सुरू केली आहे. इच्छुक ग्राहक 999 रुपये भरून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून हा फोन प्री-बुक करू शकतात. मात्र लक्षात घ्या की, हे पेमेंट Amazon पे बॅलन्समधून करावे लागणार आहे. प्री-बुकिंगसाठी येथे क्लिक करा

प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांना अप्रतिम बेनिफिट्स मिळतील. होय, प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर केवळ 299 रुपयांमध्ये 25W चार्जिंग ॲडॉप्टर मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ॲडॉप्टरची किंमत 1,299 रुपये आहे. एवढेच नाही तर, फोन खरेदी केल्यानंतर प्री-बुकिंगची रक्कम तुमच्या Amazon Pay बॅलन्समध्ये परत केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. फोनसाठी प्री-बुकिंग 8 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

Samsung Galaxy M15 5G चे मुख्य तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon वर फोनचे मुख्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत. त्यानुसार, या फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. याशिवाय, फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये दोन रॅम आणि स्टोरेज पर्याय उपलब्ध असतील. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्याय मिळतील.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश असेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. या फोनची बॅटरी 6000mAh असेल, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. लक्षात घ्या की, फोन लाँच झाल्यानंतर फोनची खाहरी किंमत पुढे येईल. सध्या Amazon वर हा फोनची किंमत XX999 रुपये अशी दाखवण्यात येत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo