मागील आठवड्यात Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन SIRIM साईटवर बघितला गेला. त्यानंतर आता कंपनीने भारतीय बाजारात स्मार्टफोनच्या अधिकृत लाँचची तारीख जाहीर केली आहे. AMAZON इंडियावर डिवाइसची मायक्रोसाईट देखील लाईव्ह झाली आहे. बघुयात डिटेल्स-
Samsung Galaxy M14 5G लाँच डेट
Samsung Galaxy M14 5G चे ऑफिशियल लाँच 17 एप्रिल 2023 ला ठेवले गेले आहे, असे सांगण्यात आले आहे. हे लाँच दुपारी 12 वाजता होणार आहे. दरम्यान, ऍमेझॉन इंडियाने डिवाइसच्या स्पेक्सचा खुलासा देखील केला आहे. स्मार्टफोनला 13 वेगवगेळे 5G बँड्स मिळणार आहेत. त्याबरोबरच, 5nm Exynos 1330 चिपसेट देखील मिळेल.
Samsung Galaxy M14 5G संभावित फीचर्स
AMAZON इंडियावर लाईव्ह झालेल्या मायक्रोसाईटद्वारे Galaxy M14 च्या डिझाईन आणि फॉर्म फॅक्टर माहिती होतो. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि प्लास्टिक रियर पॅनल मिळेल. याशिवाय, यामध्ये तीन सर्क्युलर कॅमेरा, कॅमेरा बंप मिळेल जो Samsung Galaxy A14 5G सारखा दिसतो. पेजद्वारे डिवाइसची किमंत 13,XXX हिंट दिले गेले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.