भारतीय ग्राहकांमध्ये परदेशी कंपनी SAMSUNG चे स्मार्टफोन्स लोकप्रिय आहेत. सॅमसंगचे स्मार्टफोन्स त्यांच्या लूक्स, डिझाईन्स आणि जबरदस्त फीचर्समुळे लोकप्रिय आहेत. दरम्यान, सॅमसंगने आपला नवा 5G फोन अखेर भारतात लाँच केला आहे. Samsung Galaxy M14 5G हा स्मार्टफोन बजेट विभागात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Samsung Galaxy M13 5G चे अपग्रेडेशन म्हणून आणले गेले आहे.
Samsung Galaxy M14 5G मध्ये 6.6 इंच लांबीचा फुल HD प्लस PLS LCD डिस्प्ले पॅनल मिळेल. यासह 90Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Exynos 1330 प्रोसेसरसह अँड्रॉईड 13 आधारित One UI 5 मिळेल. तसेच, यामध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळेल. तसेच, फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी मिळेल, त्यासह 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड मोउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, WiFi, USB Type-C पोर्ट इ. उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आहे आणि मॅक्रो, डेप्थ शॉटसाठी 2MPचा सेन्सर दिला गेला आहे. तसेच, फोनच्या समोरील बाजूस 16MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन बजेट श्रेणीमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 13,490 रुपये आहे. तर, 6GB +128GB व्हेरिएंटची किमंत एक हजार रुपयांनी जास्त म्हणजेच 14,990 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन ब्लु, डार्क ब्लु आणि सिल्वर कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत साईट आणि Amazon इंडियावरून 21 एप्रिलपासून सुरु होणार आहे.