Price Cut! Samsung चा ‘हा’ स्वस्त 5G फोन झाला कायमचा स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Updated on 05-Feb-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M14 स्मार्टफोच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत 1000 रुपयांची घट

Samsung Galaxy M14 फोन 50MP प्रायमरी कॅमेरासह येतो.

Samsung च्या लोकप्रिय Samsung Galaxy M14 स्मार्टफोनचे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कदाचित हीच योग्य वेळ आहे. Samsung ने गेल्या वर्षी भारतात लाँच केलेल्या या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हा हँडसेट दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात सादर करण्यात येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन्ही फोनच्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: जुने दिवस गेले? Nokia Mobile नव्हे तर HMD Global नावाने लाँच होणार नवीन फोन, टीझर Video रिलीज। Tech News

Samsung Galaxy M14 ची नवीन किंमत

Samsung ने Galaxy M14 स्मार्टफोन गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये लाँच केला होता. Samsung Galaxy M14 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB + 64GB आणि 6GB + 128GB आणि त्याची किंमत अनुक्रमे 13,490 आणि 14,990 रुपये आहे. मात्र, 1000 रुपयांच्या सवलतीनंतर, ग्राहक आता 64GB व्हेरिएंट 12,490 रुपयांना आणि 128GB व्हेरिएंट 13,990 रुपयांना खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन Icy Silver, Berry Blue आणि Smokey Teal या कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy M14 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung चा हा 5G फोन 6.6-इंच लांबीच्या FHD+ LCD डिस्प्लेसह येतो, जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. याशिवाय, डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटर ड्रॉप नॉचदेखील देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी डिव्हाइस Mali-G68 MP2 GPU सह जोडलेल्या ऑक्टा-कोर Exynos 1330 चिपसेटसह येतो. सॉफ्टवेअरच्या बाबतीत Samsung Galaxy M14 फोन Android 13 सह One UI 5.1 core वर चालतो.

फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. याशिवाय, हा फोन 6GB पर्यंत रॅम वाढवण्यासाठी हे RAM Plus फिचरला देखील सपोर्ट करते. कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 50MP प्रायमरी कॅमेरासह येतो. जो 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सरसह समर्थित आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. तसेच पॉवर बॅकअप साठी हा फोन 6000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, जो 25W जलद चार्जिंगला समर्थन देते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :