Samsung Galaxy M14 5G फोनच्या किमतीत मोठी कपात! 50MP कॅमेरासह मिळतील 6000mAh बॅटरीसारखे मजबूत फीचर्स 

Samsung Galaxy M14 5G फोनच्या किमतीत मोठी कपात! 50MP कॅमेरासह मिळतील 6000mAh बॅटरीसारखे मजबूत फीचर्स 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात

Samsung Galaxy M14 5G फोन 4GB रॅम आणि 6GB रॅमसह भारतात उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 4000 रुपयांची मोठी कपात

Samsung Galaxy M14 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने मागील वर्षी 2023 साली आपला स्वस्त 5G फोन Samsung Galaxy M14 5G लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट विभागात सादर केला. हा फोन बजेट किमतीत 6000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 50MP कॅमेराच्या सामर्थ्याने सुसज्ज आहे. मात्र, या फोनच्या किमतीत आता मोठी कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर हा स्मार्टफोन आता 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M14 ची नवी किंमत-

Also Read: Infinix Note 40 5G फोनची भारतात पहिली Sale आज, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Samsung Galaxy M14 5G फोनची किंमत

Samsung Galaxy M14 5G फोन 4GB रॅम आणि 6GB रॅमसह भारतात उपलब्ध आहे. हे दोन्ही व्हेरिएंट 128GB स्टोरेज सपोर्टसह येतात. फोनच्या 4GB RAM ची किंमत 13,490 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. आता या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 4000 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर, हा फोन तुम्हाला केवळ 9,490 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. Buy From Here

Samsung Galaxy M14 5G फोनच्या किमतीत मोठी कपात!
Samsung Galaxy M14 5G color variants

तसेच, या फोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14,490 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. या फोनमध्ये देखील मोठी कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर हा स्मार्टफोन केवळ 11,599 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

Samsung Galaxy M14 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Samsung Galaxy M14 5G फोन 6.6-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही वॉटरड्रॉप नॉच स्टाईल स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सपोर्टसह येते. Samsung Galaxy M14 5G फोन कंपनीच्या स्वतःच्या Exynos 1330 Octa प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यामध्ये LED फ्लॅशसह 50MP मुख्य सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्ससह कार्य करतो. तर, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 13MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोन 6000mAh मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo