Samsung ने अलीकडेच घोषणा केली होती की, ते लवकरच नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करणार आहेत. Samsung Galaxy M14 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीने यासाठी सपोर्ट पेज देखील लाईव्ह केले आहे. एवढेच नाही तर, Galaxy M सीरीज फोन व्यतिरिक्त Samsung F सीरीज स्मार्टफोन Galaxy F14 देखील लाँच होणार आहे.
दरम्यान, लाँच होण्यापूर्वी दोन्ही फोनचे डिझाईन युजर मॅन्युअलमधून समोर आले आहे. दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्समध्ये देखील फारसा फरक असणार नाही. तसेच, डिझाइन देखील समान आहे. हे विविध बाजारपेठेत सादर केले जातील.
युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या फोटोनुसार, दोन्ही स्मार्टफोन समान डिझाइनसह येतील. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूल फोनच्या मागील पॅनलवर उजव्या बाजूला देण्यात येणार आहे. याशिवाय, डिस्प्लेवर वरील बाजूला वॉटरड्रॉप नॉच आहे. डिव्हाइसमध्ये एक पॉवर बटण देखील उपलब्ध आहे, जे फिंगरप्रिंट सेन्सर म्हणून देखील काम करेल.
याशिवाय, उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर असेल, फ्रेमच्या डाव्या बाजूला सिम ट्रे देण्यात आला आहे. एवढेच नाही तर, फोनमध्ये सिंगल फायरिंग स्पीकर, हेडफोन जॅक आणि फ्रेमच्या बॉटमला USB टाइप-C पोर्ट आहे. बजेट स्मार्टफोन असूनही ते NFC ला देखील सपोर्ट करेल.
Samsung ने मागील वर्षी Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. स्पेसीफिकेक्शन्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये Exynos 1330 प्रोसेसर आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4GB रॅमसह 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. फोन 6000mAh बॅटरीसह येतो, जो 25W चार्जिंगला सपोर्ट करतो.