Price Drop: Samsung च्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात, Affordable दरात खरेदी करा। Tech News

Price Drop: Samsung च्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात, Affordable दरात खरेदी करा। Tech News
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M13 मध्ये ऑक्टा-कोर Samsung Exynos 850 प्रोसेसर उपलब्ध

Samsung Galaxy M13 फोन 14,999 रुपयांऐवजी 10,999 रुपयांना खरेदी करू शकता.

सध्या Amazon India वर Samsung Galaxy M13 स्मार्टफोनवर 27% डिस्काउंटसह सूचीबद्ध आहे

सॅमसंग चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. अशात जर तुम्हाला Samsung चे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Samsung Galaxy M13 हा कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन आहे. ज्याच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. खरं तर, Amazon India ने तुमच्यासाठी अशीच एक ऑफर जाहीर केली आहे. Amazon India वर Samsung Galaxy M13 च्या किमतीत मोठी घट झाली आहे. चला तर मग बघुयात फोनची नवी किंमत. 

Samsung Galaxy M13 ची वर उपलब्ध ऑफर्स 

सध्या Amazon India वर Samsung Galaxy M13 स्मार्टफोनवर 27% डिस्काउंटसह सूचीबद्ध आहे. त्यानंतर तुम्ही हा फोन 14,999 रुपयांऐवजी 10,999 रुपयांना खरेदी करू शकता. मात्र, ही केवळ प्रारंभिक सवलत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येईल.

Samsung galaxy m13 5g price drop in India

तुम्हाला Amazon India वर एक्सचेंज ऑफर म्हणून 10,350 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. तुमचा जुना फोन बदलून तुम्ही Galaxy M13 अगदी कमी किमतीत स्वतःचा बनवू शकता. पण, ही ऑफर तुमच्यासाठी आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाकावा लागेल आणि तुम्हाला ही ऑफर मिळेल की नाही, हे लक्षात येईल. ही ऑफर मिळवण्यासाठी अजून एक अट आहे, ती म्हणजे एक्सचेंजसाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असावा.

Samsung Galaxy M13 चे मुख्य तपशील 

Samsung Galaxy M13 फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह Samsung Galaxy M13 मध्ये ऑक्टा-कोर Samsung Exynos 850 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे, तुम्हाला मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनमध्ये 1TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची संधी देखील दिली जाते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यात 50MP+5MP+2MP चा कॅमेरा सेटअप मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo