जबरदस्त ऑफर ! Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन 3300 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध

जबरदस्त ऑफर ! Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन 3300 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M13 5G सवलतीसह खरेदी करा.

फेडरल बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10 टक्के म्हणजेच 3,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळण्याची शक्यता

हा फोन 874 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी केला जाऊ शकतो.

Flipkart वर इयर एंड सेल संपला आहे, पण डील आणि डिस्काउंट अजूनही उपलब्ध आहेत. जर तुम्ही  Samsung Galaxy M13 5G हा सर्वात स्वस्त सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्लिपकार्टने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर सादर केली आहे. होय, Samsung Galaxy M13 5G ला या बँक ऑफर आणि प्राईस कटचे जोरदार फायदे मिळत आहेत. Samsung Galaxy M13 5G वर उपलब्ध असलेल्या या डीलबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

हे सुद्धा वाचा : वर्षभराच्या वैधतेसह Jio चा स्वस्त रिचार्ज! अमर्यादित डेटासह मिळेल जबरदस्त इंटरनेट स्पीड

Samsung Galaxy M13 5G ची प्राईस कट आणि ऑफर

Samsung Galaxy M13 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,109 रुपये आहे. तुम्हाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% म्हणजेच 2,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय फेडरल बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10 टक्के म्हणजेच 3,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. 

 हा फोन 874 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता हा फोन 12,699 रुपयांना म्हणजेच 3,300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

Samsung Galaxy M13 5G ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

 Samsung Galaxy M13 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे तर, हा Android 12.0 वर आधारित One UI 4 वर काम करतो.

 या फोनमध्ये पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये Wi-Fi, 5G आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहेत. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, ज्याला 15W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo