digit zero1 awards

त्वरा करा! Samsung च्या ‘या’ लोकप्रिय फोनवर भारी सवलत, Limted Time ऑफर। Tech News

त्वरा करा! Samsung च्या ‘या’ लोकप्रिय फोनवर भारी सवलत, Limted Time ऑफर। Tech News
HIGHLIGHTS

Amazon India ने या बजेट स्मार्टफोनवर मर्यादित काळासाठी एक अप्रतिम डील जाहीर केली आहे.

Samsung Galaxy M04 स्मार्टफोन सध्या Amazon India वर अतिशय कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध

सध्या Amazon या Samsung Galaxy M04वर 46% ची सूट दिली जात आहे.

तुमच्याकडे पैसे कमी आहेत, पण चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला बजेट किमतीत अप्रतिम फोन हवा असेल, तर तुम्हाला सध्या Amazon India वर एक उत्तम ऑफर मिळत आहे. सध्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर दिवाळी सेलचे वातावरण सुरू झाले आहे. अशा स्थितीत Samsung, Oppo सारखे अनेक स्मार्टफोन ब्रँड त्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या ऑफर देऊ करत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy F04 वर मिळणाऱ्या ऑफरची माहिती देणार आहोत.

होय, Amazon India ने या बजेट स्मार्टफोनवर मर्यादित काळासाठी एक अप्रतिम डील जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 7000 रुपयांच्या आत खरेदी करू शकता. खरं तर, Samsung Galaxy M04 स्मार्टफोन सध्या तुम्हाला Amazon India वर अतिशय कमी किमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या सॅमसंग फोनवर चांगली बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M04
Samsung Galaxy M04

Samsung Galaxy M04 ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत सुमारे 11,999 रुपये आहे. मात्र, सध्या Amazon या फोनवर 46% ची सूट दिली जात आहे. या ऑफरनंतर Samsung Galaxy M04 स्मार्टफोन साईटवर फक्त 6,499 रुपयांमध्ये सूचिबद्ध झाला आहे. त्याबरोबरच, तुम्हाला Samsung Galaxy M04 स्मार्टफोनवर 6,150 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. मात्र, यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन स्थितीत हवा.

Samsung Galaxy M04 चे मुख्य तपशील

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये MediaTek Helio P35 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये Android 12 च्या समर्थनासह One UI core 4.1 स्किन देखील आहे. तसेच, 64GB स्टोरेजदेखील आहे, तुम्ही मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देखील आहे. या फोनमध्ये 13MP प्राथमिक कॅमेरा आणि पुढील बाजूस 5MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे. काही मूलभूत कार्यांसह ही बॅटरी दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo