Samsung Galaxy J8 स्मार्टफोन भारतात 28 June ला सेल साठी होईल उपलब्ध

Updated on 28-Jun-2018
HIGHLIGHTS

Samsung ने मागच्या महिन्यात भारतात आपला Samsung Galaxy J8 स्मार्टफोन लॉन्च केला होता. याच्या लॉन्च च्या वेळी याच्या उपलब्धते बद्दल सांगण्यात आले होते की हा 20 जूनला उपलब्ध केला जाईल. पण अजूनही याचा कोणताही सेल झाला नाही.

Samsung Galaxy J8 Smartphone goes on Sale on 28 June: Samsung ने पिछले महीने भारत में अपने Samsung ने मागच्या महिन्यात भारतात आपला Samsung Galaxy J8 स्मार्टफोन लॉन्च केला होता. याच्या लॉन्च च्या वेळी याच्या उपलब्धते बद्दल सांगण्यात आले होते की हा 20 जूनला उपलब्ध केला जाईल. पण अजूनही याचा कोणताही सेल झाला नाही. पण आता कंपनी ने याची माहिती दिली आहे की हा डिवाइस लवकरच सेल साठी येणार आहे, हा डिवाइस सेल साठी येण्यासाठी आता फक्त 2 दिवस उरले आहेत. याचा अर्थ असा आहे की भारतात हा डिवाइस 28 जूनला सेल साठी येणार आहे. 
कंपनी ने आपल्या ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून या डिवाइस च्या भारतातील लॉन्च ची माहिती दिली होती. तुम्ही इथे हे ट्विट बघू शकता. 

या डिवाइस च्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर हा भारतात Rs 18,990 च्या किंमतीत घेतला जाऊ शकतो. फोन मध्ये तुम्हाला 4GB च्या रॅम सह 64GB ची स्टोरेज मिळत आहे. फोन ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे. हा डिवाइस तुम्ही भारतात ई-स्टोर च्या माध्यमातून घेऊ शकता, पण अजून याबद्दल माहिती समोर आली नाही की हा कोणत्या चॅनल मधून सेल साठी आणला जाणार आहे. 

स्मार्टफोन मध्ये एक ड्यूल सिम स्लॉट सोबत 6-इंचाचा FHD+ सुपर AMOLED इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हेही लक्षात असू दे की हा स्मार्टफोन एंड्राइड Oreo वर चालतो. फोन मध्ये एक ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट देण्यात आला आहे, तसेच यात एक 4GB चा रॅम पण देण्यात आला आहे. 
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, हा एक 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त फोन मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 64GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवू शकता. ही तुम्ही 256GB पर्यंत वाढवू शकता. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :