Samsung Galaxy J8 बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर दिसला आहे. पण यावेळेस यात एक वेगळा चिपसेट आहे. काही आठवड्यांपूर्वी हा Exynos 7870 चिपसेट सह दाखविण्यात आला होता, तिथे याला SM-J800FN मॉडल नंबर सह लिस्ट करण्यात आले होते. पण आता हा फोन SM-J805G मॉडल नंबर सह गीकबेंच वर दिसला आहे, इथे हा स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर सह लिस्ट करण्यात आला आहे.
याला पाहिल्यावर अस वाटतय की, हा Galaxy J8 चा Plus वेरियंट आहे, जो जास्त पॉवरफुल आहे. हे दोन्ही वर्जन एंड्राइड 8.0 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम वर चालतील.
J805G मॉडल मध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे, तर याच्या दुसर्या मॉडल मध्ये 3GB रॅम आहे. दोघांमध्ये ओक्टा-कोर कॉर्टेक्स-A53 प्रोसेसर आहे.
आशा आहे की, या दोन्हींच्या स्टोरेज मध्ये फरक असेल आणि त्यामुळे यांच्या किंमतीत पण फरक असेल.