Samsung Galaxy J8 मिळाले OTA अपडेट मधून हे खास फीचर्स

Updated on 19-Nov-2018
HIGHLIGHTS

सॅमसंग स्मार्टफोन्सना OTA अपडेट मिळत आहे. या अपडेट नंतर यूजर्सना AR इमोजी आणि ड्यूल 4G VoLTE सपोर्ट मिळण्यासोबतच अनेक अजून पण फीचर्स घेण्याची संधी मिळत आहे.

साल 2018 च्या मधेच स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग ने Galaxy J8 भारतात Galaxy J6 सोबतच लॉन्च केला होता. बाकी सॅमसंग मोबाईल फोन्स प्रमाणेच Galaxy J8 पण लॉन्च नंतर अनेक प्रकरचे सॉफ्टवेयर अपडेट्स मिळाले नाहीत. दीर्घकाळानंतर सॅमसंग फोनला Over-The-Air (OTA) अपडेट मिळणार आहे. या अपडेट नंतर यूजर्सना नवीन फीचर्सची एक चांगली रेंज मिळू शकते. या अपडेट नंतर यूजर्सना AR इमोजी आणि ड्यूल 4G VoLTE सपोर्ट मिळेल. सॅमसंग ने Galaxy J8 यूजर्स साठी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट रोल-आउट करायला सुरवात केली आहे. तुम्हाला अंगू इच्छितो कि कंपनी ने हा अपडेट एक एक फेज्ड पद्धतीने जारी केला आहे. याचा अर्थ असा आहे कि सध्या काही यूजर्सना हा अपडेट मिळाला आहे. तर बाकी यूजर्स ज्यांना OTA अपडेट मिळाला नाही, त्यांना काही काळ वाट बघावी लागू शकते. 

Galaxy J8 चा हा OTA अपडेट J810GDDU2ARJ4 बिल्ड वर्जन सह येतो जर तुम्हाला OTA अपडेट मिळाला असेल तर तुम्ही तुमचा फोन Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट करून हा इनस्टॉल करू शकता. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे Galaxy J8 यूजर्सनी आपल्या मोबाईल फोन मध्ये अपडेट इनस्टॉल करण्याआधी डेटाचा बॅक-अप घ्या. अनेक सुधार घेऊन हा अपडेट येत आहे. Galaxy J8 AR इमोजी मिळवणारा सॅमसंग 'J' सीरीजचा पहिला स्मार्टफोन बनला आहे. या फीचरने यूजर्सची सेल्फी एनिमेटेड वर्जन मध्ये रूपांतरित होते. तसेच ड्यूल 4G VoLTE सपोर्टच्या मदतीने यूजर्स दोन 4G सिम कार्ड एक साथ वापरू शकतील. सोबतच सॅमसंग ने या स्मार्टफोन मध्ये सॉफ्टवेयर आधारित Auto Brightness feature पण ऍड केली आहे. Galaxy J8 ची बेस किंमत 18,990 रुपये आहे.

Samsung Galaxy J8 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Samsung Galaxy J8 एका 6 इंचाच्या डिस्प्ले सह 720×1440 पिक्सेल रेजोल्यूशन सोबत येतो. यात 1.6GHz octa-core प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा डिवाइस 4GB RAM आणि 64GB च्या इंटरनल स्टोरेज सह येतो जी microSD च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते. कॅमेरा बद्दल बोलायचे तर यात बॅक पॅनल वर ड्यूल कॅमेरा आणि फ्रंटला सिंगल सेंसर देण्यात आला आहे. रियर पॅनल वर 16-megapixel चा प्राइमरी कॅमेरा आणि 5-megapixel चा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 16-megapixel चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याची बॅटरी 3500mAh ची आहे.
 

 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :