Samsung Galaxy J7 Pro ची किंमत झाली 2000 रुपयांनी कमी

Samsung Galaxy J7 Pro ची किंमत झाली 2000 रुपयांनी कमी
HIGHLIGHTS

J7 Pro ची किंमत पुन्हा एकदा 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 18,990 रूपये झाली आहे.

Samsung Galaxy J7 Pro च्या किंमतीत भारतात कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन जून 2017 मध्ये J7 Max सोबत लॉन्च करण्यात आला होता. यावर्षी मार्च मध्ये दोन्ही डिवाइस च्या किंमतीत 2000 रूपयांची कपात करण्यात आली होती. आता, J7 Pro ची किंमत पुन्हा एकदा 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे ज्यामुळे याची किंमत कमी होऊन 18,990 रूपये झाली आहे.

एक विश्वासू ट्विटर यूजर आणि मुंबई च्या मोबाइल रिटेलर Mahesh Telecom ने देशातील Galaxy J7 Pro च्या किंमतीत होणार्‍या कपातीचा खुलासा केला आहे. पण अजूनतरी ही किंमत कंपनी च्या ऑनलाइन पोर्टल किंवा अन्य ई-कॉमर्स पोर्टल्स जसे की फ्लिपकार्ट किंवा अमेजॉन वर दिसत नाही. 
बोलले जात आहे की ही किंमत ऑफलाइन चॅनल्स वर लागू होईल. आगामी काही दिवसांमध्ये ऑनलाइन पोर्टल्स वर पण हा बदल दिसण्याची शक्यता आहे. Samsung ने आता पर्यंत याची अधिकृत माहिती दिली नाही. 

Samsung Galaxy J7 Pro मध्ये 5.5-इंचाचा फुल HD सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1080×1920 पिक्सल आहे. यात सॅमसंग चा Exynos 7870 ओक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅम आहे. 

यात 13MP चा रियर कॅमेरा f/1.7 अपर्चर सह आहे. तसेच यात 13MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण देण्यात आला आहे. यात 64GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे, स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. यात 3600mAh ची बॅटरी पण आहे. यात डुअल-सिम स्लॉट, NFC, USB टाइप-C पोर्ट आणि 4G LTE फीचर आहेत. याची जाडी 7.9mm आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo