Galaxy J7 Prime 2 13,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता पण आता या कपाती नंतर हा डिवाइस 11,990 रुपयांमध्ये कंपनी च्या अधिकृत ऑनलाइन स्टोर वरून विकत घेता येईल.
सॅमसंग ने भारतात आपल्या Galaxy J7 Prime 2 स्मार्टफोन ची किंमत कमी केली आहे. स्मार्टफोन 13,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता पण आता हा आपल्या अधिकृत ऑनलाइन स्टोर वर डिवाइस 11,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि गोल्ड दोन रंगात उपलब्ध आहे. Samsung Galaxy J7 Prime 2 मध्ये मेटल यूनीबॉडी डिजाइन देण्यात आली आहे आणि हा बिल्ट-इन सॅमसंग मॉल सह येतो. स्मार्टफोन ची अजून एक खासियत म्हणजे सॅमसंग पे मिनी. या पेमेंट फीचर मधून UPI किंवा ई-वॉलेट वापरून ट्रांजेक्शंस करता येतात.
या डिवाइस बद्दल तसेच याच्या स्पेक्स आणि फीचर्स बोलायचे झाले तर स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.5-इंचाचा FHD 1080×1920 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 3GB चा रॅम पण मिळत आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे तर स्मार्टफोन मध्ये 32GB ची इंटरनल स्टोरेज आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवू शकता.
फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला वाई-फाई 802.11 b/g/n, GPS, Bluetooth 4.1, 3G, 4G चा सपोर्ट मिळत आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला एक 3300mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.