Samsung Galaxy J7 Prime 2 स्मार्टफोन 28 मार्च पासून सर्व ऑफलाइन स्टोर्स वर सेल साठी आला आहे, लवकरच हा फोन तुम्ही सॅमसंग इंडिया च्या वेबसाइट वरून खरेदी करू शकाल.
मागच्याच आठवड्यात सॅमसंग ने आपल्या Samsung Galaxy J7 Prime 2 स्मार्टफोन ला कोणत्याही बातमी वीना लॉन्च केले होते. आणि आता हा डिवाइस भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन भारतातील सर्व ऑफलाइन स्टोर्स मधून विकत घेतला जाऊ शकतो, हा सेल साठी 28 मार्च पासूनच उपलब्ध झाला आहे. याव्यतिरिक्त हा सॅमसंग इंडिया च्या वेबसाइट वरून पण लवकरच सेल साठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोन च्या काही मुख्य फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला ओक्टा-कोर एक्सीनोस 7 सीरीज चा प्रोसेसर मिळत आहे, तसेच याचा 13-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण याची एक मोठी खासियत आहे. स्मार्टफोन मध्ये फ्रंटला तुम्हाला एक फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला सॅमसंग पे मिनी चा पण सपोर्ट मिळत आहे. या स्मार्टफोन ला तुम्ही ब्लॅक आणि गोल्ड या दोन वेगवेगळ्या रंगाच्य ऑप्शन मध्ये विकत घेऊ शकता. या नव्या डिवाइस च्या स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 5.5-इंचाचा FHD 1080×1920 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले मिळत आहे. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 3GB ची रॅम पण मिळत आहे. स्टोरेज पाहता स्मार्टफोन मध्ये 32GB ची इंटरनल स्टोरेज आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकता. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि 13-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला वाई-फाई 802.11 b/g/n, GPS, Bluetooth 4.1, 3G, 4G सपोर्ट मिळत आहे यासोबतच यात तुम्हाला एक 3300mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.