सॅमसंग गॅलेक्सी J7 Duo ची किंमत या आधी पण कमी झाली आहे, आणि आता पुन्हा एकदा या डिवाइस ची किंमत कमी करण्यात आली आहे.
Samsung Galaxy J7 Duo स्मार्टफोन सॅमसंगचा एक अफोर्डेबल फोन आहे, या डिवाइस ची किंमत या वर्षी मे मध्ये एकदा कमी करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा या डिवाइस ची किंमत कमी झाली आहे. मुंबईतील महेश टेलीकॉम कडून ही बाब समोर आली आहे. या रिटेलर नुसार या डिवाइस ची किंमत जवळपास Rs 2,000 ने कमी झाली आहे.
हा डिवाइस यावर्षी च्या सुरवातीला लॉन्च करण्यात आला होता, आणि तेव्हा याची किंमत Rs 16,990 होती, त्यानंतर मे मध्ये या डिवाइस ची किंमत पहिल्यांदा Rs 1,000 ने कमी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या डिवाइस च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली, ज्यामुळे हा डिवाइस फक्त Rs 13,990 मध्ये घेता येईल.
कमी झालेली ही किंमत फ्लिपकार्ट आणि अमेजॉन इंडिया वर पण दिसत आहे. या डिवाइस ची किंमत तिथे जवळपास Rs 14,990 सांगण्यात येत आहे, पण जर तुम्ही हा घेणार असाल तर तुम्हाला यावर काही चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट इत्यादी मिळत आहेत, जसे की हा डिवाइस तुम्ही No-Cost EMI सह Rs 2,499 प्रति माह मध्ये विकत घेऊ शकता.
त्याचबरोबर रिलायंस जियो कडून या डिवाइस सोबत तुम्हाला जवळपास Rs 2,750 चा कॅशबॅक पण मिळत आहे. पण जियो चा हा कॅशबॅक तुम्हाला Rs 198 आणि Rs 299 वाल्या प्लान्स सोबत Rs 50 च्या 55 वाउचर्स च्या स्वरुपात मिळत आहे.