Samsung Galaxy J7 Duo स्मार्टफोन च्या बाबतीत अनेकदा इंटरनेट वर लीक आणि रुमर्स समोर आले आहेत. जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की या डिवाइस बद्दल यावेळी कोणतीही नवीन बातमी समोर आली नाही पण हा कंपनी च्या भारतातील अधिकृत वेबसाइट वर पहिल्यांदा लिस्ट झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन बेंचमार्क साइट्स आणि यूजर्स मॅन्युअल इत्यादि च्या माध्यमातुन समोर आला आहे.
या बातम्यांमधून समोर आलेले की या डिवाइस मध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप सह यात Bixby Home पण मिळणार आहे. जर असे झाले तर हा पहिला स्मार्टफोन असेल, जो तुमच्या बजेट मध्ये येईल आणि ज्यात Bixby असेल.
जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हा स्मार्टफोन भारतातील अधिकृत कंपनी वेबसाइट वर दिसला आहे. त्यामुळे असे जर काही होत असेल तर या स्मार्टफोन च्या भारतातील लॉन्च साठी खुप कमी वेळ उरला आहे असे म्हणता येईल. अर्थात् स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होण्याची सर्व चिन्हे दिसत आहेत.
या स्मार्टफोन च्या काही स्पेक्स पण आता काही दिवसांपूर्वी लीक झाले आहेत. फोन मध्ये तुम्हाला एक 5.5-इंचाचा HD Super AMOLED 2.5D कर्व ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला एक 1.6Ghz चा ओक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 3GB रॅम सह 32GB ची इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 256GB पर्यंत वाढवू शकतो. फोन एंड्राइड 8.0 Oreo वर चालतो.
याव्यतिरिक्त तुम्हाला ड्यूल सिम सपोर्ट पण मिळत आहे. कॅमेरा पाहता यात 13-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा कॉम्बो असणार आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सल चा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन मध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर पण असणार आहे. जो तुम्हाला होम बटन मध्ये मिळेल. यात एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी असण्याची शक्यता आहे.
सॅमसंग गॅलेक्सी J7 Duo स्मार्टफोन ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे की हा डिवाइस 23 एप्रिल च्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. याच्या लॉन्च च्या वेळेस याची किंमत समोर येईल.