सॅमसंग भारतात या सणासुदीच्या सीजन मध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करू शकते. असे बोलले जात आहे की Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ भारतात लॉन्च केले जाऊ शकतात आणि हे स्मार्टफोन्स मिड-रेंज सेगमेंट मध्ये लॉन्च होतील. असे पण समोर येत आहे की या महिन्याच्या अखेरीस Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ भारतात लॉन्च केले जाऊ शकतात. पण अजूनतरी कंपनी कडून Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ च्या लॉन्च बद्दल कोणतीही ठोस किंवा अधिकृत माहिती समोर आली नाही.
पण Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ बद्दल बोलले जात आहे की हे True HD+ इनफिनिटी डिस्प्ले, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केले जाऊ शकतात. त्याचबरोबर असे पण समोर येत आहे की Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ अनेक रंगांच्या ऑप्शन मध्ये सॅमसंग कडून सादर केले जाऊ शकतात.
तसेच Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ स्मार्टफोन्स सोबत Samsung नवीन Animoji सारखा फीचर ज्याला Emotify बोलले जात आहे, तो पण लॉन्च केला जाऊ शकतो. तुमच्या तर लक्षात असेलच की सॅमसंग ने भारतात यावर्षीच्या सुरवातीला आपले सॅमसंग गॅलेक्सी जे6 आणि सॅमसंग गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. याच दोन जुन्या मोबाईल फोन्सच्या जेनेरेशन मध्ये सॅमसंग नवीन मोबाईल फोन्स म्हणजे Samsung Galaxy J6+ आणि Galaxy J4+ लॉन्च करणार आहे.