सॅमसंगने आपले गॅलेक्सी J5 आणि गॅलेक्सी J7 च्या २०१६ एडिशन्सला भारतात लाँच केले आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत क्रमश: १३,९९० रुपये आणि १५,९९० रुपये आहे. त्याशिवाय आपण ह्याला १० मे पासून एक्सक्लुसिवरित्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करु शकता, ह्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2GB ची रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर काम करतो, त्याशिवाय हे स्मार्टफोन्स “S bike Mode” सह येतात. हे तेच फीचर आहेत ज्याला आम्ही पहिल्यांदा गॅलेक्सी J3 मध्ये पाहिले होते.
गॅलेक्सी J5 2016 मध्ये 5.2 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात आपल्याला 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 3100mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
हेदेखील पाहा – फोटोग्राफीची मूळ बाराखडी शिकवतील हे अॅप्स
हेदेखील वाचा – मोटोरोला मोटो X 2016 चे नवीन फोटो लीक
हेदेखील वाचा – निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट खरेदी करणे फायद्याचे?