सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J3 चा नवीन व्हर्जन V लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सुपर AMOLED HD डिस्प्ले आणि अॅनड्रॉईड मार्शमॅलोवर चालतो.
सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी J3 2016 चा 16GB व्हर्जन US मध्ये लाँच केला आणि ह्या स्मार्टफोनला सॅमसंग गॅलेक्सी J3 V नाव दिले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १६८ डॉलर आहे. ह्याची किंमत ११,२६८ रुपये आहे. हा स्मार्टफोन रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून २३ जूनपासून उपलब्ध होईल.
तसे ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जास्त फरक नाही. मात्र ह्याच्या अंतर्गत स्टोरेजमध्ये आपल्याला बराच फरक दिसेल. J3 V स्मार्टफोन 16GB अंतर्गत स्टोरेजसह मिळत आहे. हा अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो. J3 2016 स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.1 वर चालतो. ह्याला भारतात ८,९९९० रुपयाच्या किंमतीत लाँच केले गेले होते.
स्टोरेजशिवाय ह्या स्मार्टफोन्समध्ये काही विशेष फरक नाही. गॅलेक्सी J3 V स्मार्टफोनमध्ये आपल्याला ५ इंचाची HD सुपर AMOLED डिस्प्ले मिळत आहे. ह्यात आपल्याला 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅमसुद्धा मिळत आहे. हा अल्ट्रा डाटा सेविंग मोडसह येतो.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 128GB पर्यंतचा स्टोरेज पर्याय मिळत आहे. हा एक 4G सपोर्ट करणारा स्मार्टफोन आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला ब्लूटुथ, GPS, मायक्रो-USB पोर्ट आणि 2600mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे.
हेदेखील वाचा – हे आहेत वनप्लस 3 चे प्रतिस्पर्धी: पाहा ह्यांच्या स्पेक्स आणि बेंचमार्कची तुलना
हेदेखील वाचा – हार्ले डेविडसन बनवत आहे एक इलेक्ट्रिक बाइक!