Samsung Galaxy J3 (2018) चे काही वेरियंट WFA ने केले प्रमाणित
या हँडसेट ची लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा.
Samsung Galaxy J3 (2018) ला Wi-Fi एलायंस कडून अधिकृत सर्टिफिकेशन मिळाले आहे, याचा अर्थ असा होतो की या हँडसेट ची अधिकृत घोषणा होण्यास जास्त वेळ नाही लागणार. या डिवाइस ला काही वेरियंट मध्ये प्रमाणित करण्यात आले आहे, जे U.S मध्ये लॉन्च केले जातील.
पहिला वेरियंट मॉडल नंबर SM-J337T नावाने समोर आला आहे. असे वाटत आहे की हा वेरियंट T-मोबाइल ने प्रस्तावित केला आहे, कारण या कॅरियर ने मॉडल क्रमांक SM-J327T सह J3 (2017) लॉन्च केला गेला होता.
सॅमसंग गॅलेक्सी जे 3 प्राइम 2 च्या अंतर्गत T-मोबाइल हा हँडसेट लॉन्च करू शकते. तसेच Wi-Fi एलायंस ने कथित AT&T वेरियंट पण दाखवला आहे, जो गॅलेक्सी एक्सप्रेस प्राइम 3 नावाने समोर येण्याची अफवा आहे. हा मॉडेल नंबर SM-J337A सह येऊ शकतो. याचे 2 वेरियंट आहेत, जे मॉडेल नंबर SM-J336AZ आणि मॉडेल नंबर SM-J337AZ सह सादर केले जाऊ शकतात.
हे वेरियंट Galaxy Sol 3 आणि Galaxy Amp Prime 3 असल्याचे बोलू शकतो. आम्हाला स्प्रिंट कडून मिळालेल्या माहितीनुसार Galaxy J3 Emerge 2 नावाने एक वेरियंट येण्याची शक्यता आहे. याच्या स्पेसिफिकेशन बद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही, पण लेटेस्ट बेंचमार्क वरून संकेत मिळाले आहेत की हा एंड्रॉयड 8.0 ओरियो आउट ऑफ द बॉक्स वर चालेल. याव्यतिरिक्त ही पण बातमी आहे की हा 2GB रॅम सह एक्सिनोस 7570 प्रोसेसर वर चालेल.
नोट: फीचर्ड इमेज सॅमसंग गॅलेक्सी J3 2017 ची आहे.