स्नॅपडिलवर खरेदी करा सॅमसंग गॅलेक्सी J3 (2016)८४९० रुपये
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी सॅमसंगने आपला फोन गॅलेक्सी J3 (2016) च्या किंमतीत घट केली आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनला ह्या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केले होते. लाँचवेळी ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९० रुपये होती आणि आता कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ५०० रुपयांनी कमी केली आहे आणि आता हा फोन ८,४९० रुपयात मिळत आहे. ह्या स्मार्टफोनला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर खरेदी करु शकता. हा फोन काळा, पांढरा आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी J3 (2016) स्मार्टफोन S बाइक मोडसह येतो. ह्यात कंपनी ह्या फोनसह एक NFC टॅग देत आहे. यूजरला ह्या NFC टॅगला आपल्या बाइकवर लावावे लागते आणि बाइक चालवताना आपल्या फोनला ह्या NFC टॅगवर टॅप करावे लागते आणि जेव्हा आपण बाइक चालवत असाल, तेव्हा त्याला कॉल करणा-या व्यक्तीला एक मेसेज मिळतो, की यूजर आता बाइक चालवत आहे.
हा एक ड्यूल-सिम सपोर्ट स्मार्टफोन आहे, ज्यात ५ इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले 1280×720 पिक्सेल असणार आहे. त्याशिवाय ह्यात 1.5GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आणि 1.5GB ची रॅम दिली आहे. फोनमध्ये आपल्याला 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकता. स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह सॅमसंग आपल्या टचविज UI वर चालतो.
हेदेखील वाचा – ७००० रुपयांच्या किंमतीत येणारे ५ उत्कृष्ट स्मार्टफोन्स
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 8MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. स्मार्टफोनमध्ये 2600mAh क्षमतेची उत्कृष्ट बॅटरी मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात आपल्याला 4G सपोर्टसह 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB फीचर मिळत आहे.
हेदेखील वाचा – अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये
हेदेखील वाचा – HTC डिझायर 630 स्मार्टफोन भारतात झाला विक्रीसाठी उपलब्ध