काही दिवसांपासून अफवा आणि चर्चेचा विषय असलेला सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर स्मार्टफोन अखेरीस सॅमसंग ने लॉन्च केला आहे. हा डिवाइस कंपनी ने आपला एक एंट्री-लेवल एंड्राइड गो स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला आहे आणि या सोबतच सर्व अफवांवर पूर्णविराम लागला आहे.
सॅमसंग ने सांगितले आहे की भारत आणि मलेशिया मध्ये सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर स्मार्टफोन आज पासून विकत घेता येईल. अजूनतरी याची किंमत समोर आली नाही. पण यात एंड्राइड गो असल्यामुळे तसेच याचे स्पेक्स पाहता असे बोलू शकतो की हा स्मार्टफोन Rs 6000 च्या रेंज मध्ये सादर करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी जे2 कोर स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 5-इंचाची TFT स्क्रीन देण्यात आली आहे, जी 540×960 पिक्सल रेजोल्यूशन सह येते. स्मार्टफोन मध्ये एक्सीनोस 7570 प्रोसेसर 1GB रॅम सोबत तुम्हाला मिळेल. तसेच फोन मध्ये 8GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळत आहे, यात सेल्फी इत्यादी साठी तुम्हाला एक 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. या कॅमेर्याने तुम्ही विडियो चॅट वैगरे करू शकता. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 2600mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे, जी अशा डिवाइस साठी एक प्लस पॉइंट ठरू शकते. स्मार्टफोन च्या कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला वाई-फाई 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.2, USB 2.0 आणि GPS व्यतिरिक्त GLONASS चा सपोर्ट पण मिळत आहे.