सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेेक्सी J2 (2016) लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोनची किंमत ९,७५० रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन 10 जुलैपासूव ऑनलाईन आणि ऑफलाइन दोघांवरही विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन काळा, सोनेरी आणि चंदेरी अशा तीन रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर कंपनी एअरटेल प्रीपेड कस्टमर्सला ४,५०० रुपयाच्या किंमतीत डबल डाटा मोफत देत आहे.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याला नेक्स्ट जनरेशन LED नोटिफिकेशन सिस्टमसह लाँच केला आहे. ह्याला कंपनीने स्मार्ट ग्लो असे नाव दिले आहे. स्मार्ट ग्लो फिचरला क्विक पॅनलने सक्रिय केले जाऊ शकते.
गॅलेेक्सी J2 (2016) मध्ये ५ इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅमने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
हा फोन 8GB च्या अंतर्गत स्टोरेजसह लाँच केला गेला आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.
ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. ह्यात 2600mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज