सॅमसंग लवकरच लाँच करणार J1 मिनी स्मार्टफोन

सॅमसंग लवकरच लाँच करणार J1 मिनी स्मार्टफोन
HIGHLIGHTS

सॅमसंग गॅलेक्सी J1 मिनीमध्ये 4.3 इंचाची डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्युशन 800x480 पिक्सेल असेल. हा स्मार्टफोन 1GB रॅमने सुसज्ज असेल. त्याचबरोबर ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J1 मिनी सादर करण्याची शक्यता आहे. खरे पाहता, हल्लीच सॅमसंगने ह्या स्मार्टफोनला अनेक प्रमाणित साइटवर दाखवले होते. ह्यात GFX Bench, जाउबा आणि स्प्रेडेट्रम डेटा बेस यांचा समावेश आहे. हा फोन हल्लीच सॅमसंगद्वारा लाँच केेलेल्या गॅलेक्सी J1ची नवीन आवृत्ती आहे.

 

ह्या स्मार्टफोनला GFX Benchवर SM-J105F नावाने लिस्ट केले गेले आहे. फोनला स्प्रेडेट्रम SC8830 चिपसेटसह आणले आहे आणि ह्यात 1.5GHz क्वाडकोर प्रोसेसर दिला गेला आहे.

काही लीक्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी J1 मिनीमध्ये 4.3 इंचाची डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्युशन 800×480 पिक्सेल असेल. हा स्मार्टफोन 1GB रॅमने सुसज्ज असेल. त्याचबरोबर ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा वीजीए रिझोल्युशन असण्याची शक्यता आहे. हा फोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे.   

ह्याच मॉडलला जाउबा वेबसाइटवरसुद्धा लिस्ट केले गेले आहे. मात्र तेथे फोनमध्ये 4 इंचाची स्क्रीन असल्याचे बोलले जातेय. फोनला 50 अमेरिकी डॉलरवर लिस्ट केले गेले आहे, जी भारतात जवळपास  ३,४९९ रुपये इतकी आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo