मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J1 (2016) लाँच केला. मागील अनेक दिवसांपासून ह्या स्मार्टफोनवषयी अनेक बातम्या समोर येत होत्या. सॅमसंग गॅलेक्सी J1 (२०१६)च्या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची डिस्प्ले दिली आहे, तर ह्याच्या आधीच्या व्हर्जनमध्ये 4.3 इंचाची डिस्प्ले येत होती.
गॅलेक्सी J1 (2016)ला सॅमसंगने सध्यातरी दुबईत सादर केले आहे. मात्र लवकरच हा स्मार्टफोन भारता लाँच केला जाईल. दुबईमध्ये ह्या स्मार्टफोनची किंमत १३५ डॉलर(जवळपास ९,१०० रुपये) ठेवण्यात आली आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेला आहे. हा स्मार्टफोन 28NM च्या 1.3GHz चे क्वाडकोर प्रोसेसर, एक्सनोस 3475 चिपसेट आणि माली-T 720 600mAh GPU ने सुसज्ज आहे. ह्यात 1GB ची रॅमसुद्धा दिली गेली आहे. हा स्मार्टफोन 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.
हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, वायफायसह 4G LTE सपोर्टसुद्धा आहे.